वाधवान बंधूंचे भलते लाड पुरवणे महागात, सहा पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:03 AM2023-08-31T02:03:35+5:302023-08-31T05:51:02+5:30

जे. जे. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कैद्याला नातेवाइकांसोबत भेटू देणे, मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर करण्याची मुभा देणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.

Pampering Wadhawan brothers expensive, six policemen suspended, J. J. A discount was given to the hospital | वाधवान बंधूंचे भलते लाड पुरवणे महागात, सहा पोलिस निलंबित

वाधवान बंधूंचे भलते लाड पुरवणे महागात, सहा पोलिस निलंबित

googlenewsNext

नवी मुंबई : सुमारे ३४ हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात तळोजा कारागृहात कैदेत असलेल्या डीएचएलएफचे धीरज वाधवान व कपिल वाधवान या दोघा भावंडांना जे.जे. रुग्णालयात नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना विशेष सवलत दिल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील एक अधिकारी व सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कैद्याला नातेवाइकांसोबत भेटू देणे, मोबाइल, लॅपटॉप यांचा वापर करण्याची मुभा देणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. तळोजा कारागृहातील कैद्यांना पोलिस सुरक्षेत तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना नियमबाह्य सवलती दिल्या जात असल्याची बाब समोर आली होती. 

उपायुक्तांनी केली कारवाई
निलंबित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे निलंबनाचे अधिकार असलेल्या पोलिस आयुक्तांऐवजी मुख्यालय उपायुक्तांनी कारवाई केल्याचीही चर्चा आहे.

कैद्यांना दिली व्हीआयपी वागणूक
धीरज वाधवान व कपिल वाधवान या दोघा भावंडांना पोलिसांकडून विशेष सवलत मिळत होती. त्यांना रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कुटुंबासह घरचे जेवण खाण्याची तसेच मोबाइल व लॅपटॉप वापरण्याची मुभा दिली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर नवी मुंबई पोलिस मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी संबंधित सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

हे आहेत ते कर्मचारी
निलंबित केलेल्यांमध्ये उपनिरीक्षक आशुतोष देशमुख, हवालदार विशाल दखने, सागर देशमुख, प्राजक्ता पाटील, रवींद्र देवरे, प्रदीप लोखंडे व माया बारवे यांचा समावेश आहे. मंगळवारी रात्री त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. 

Web Title: Pampering Wadhawan brothers expensive, six policemen suspended, J. J. A discount was given to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.