पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू; ट्रॅक्टरवर आदळून ट्रॅव्हल बस खड्ड्यात कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 07:04 AM2024-07-16T07:04:59+5:302024-07-16T07:06:53+5:30
पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ही ट्रॅव्हलर बस पंढरपूरकडे निघाली होती. या बसमधून ५४ वारकरी प्रवास करत होते. या अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वारकरी पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली.
या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहेत, तर २० ते ३० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
ट्रॅक्टर क्रमांक एम एच 11 बिझेड 2286 वरील चालक तरवेज सलाउद्दीन अहमद (वय 28 वर्ष राहणार उत्तर प्रदेश ) हे मुंबई पुणे महामार्गावर नो एन्ट्री मध्ये पहिल्या लेनने ट्रॅक्टर चालवीत घेऊन जात होते. यावेळी जयश्री ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच 02 एफ जी 9966 चालक संजय पाटील (वय 54 वर्ष) हे आपल्या ताब्यातील बस मुंबई ते पंढरपूर चालवीत घेऊन जात असताना भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचे नादात पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रव्हल बस चालक यांचे बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार ठोकर मारून अपघात झाला. यावेळी शंभर फूट घासत नेऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर वरील तरवेज सलाउद्दीन अहमद आणि अनोळखी इसम जागीच मयत झाले. बस ही ट्रॅक्टरला ठोकर मारून डाव्या साईटच्या रेलिंग तोडून 10 ते 15 फूट खाली जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली.