शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! संदीप घोष याच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता,फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार
2
इक्बालसिंह चहल यांची पुन्हा बदली; आता देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यात मोठी जबाबदारी
3
वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी...
4
गांगुलीच्या लेकीची न्यायासाठी 'दादा'गिरी! अत्याचाराच्या घटनेनं संताप; म्हणाली, "काहीही झालं तरी..."
5
अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ! दररोज ९० घटना; ममता बॅनर्जींचे PM मोदींना खरमरीत पत्र
6
"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी   
7
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?
8
Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! 'बिग बॉस मराठी ५'चा नवा विक्रम
9
आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचा दावा.. विरोधकांची टीका...आता CM शिंदेंनी कोर्टाचे पेपरच दाखवले
10
मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!
11
पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल
12
कोणत्या धर्माच्या लोकांनी केलं सर्वाधिक स्थलांतर? कितव्या क्रमांकावर आहेत हिंदू? जाणून घ्या
13
"तुझ्यासोबत हा शेवटचा सिनेमा", असं अक्षय कुमार करीना कपूरला का म्हणाला?
14
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत
15
नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...
16
"दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोले यांचं आवाहन  
17
मंदिरातील घंटा वाजवल्याने ध्वनिप्रदूषण! प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोसायटीला बजावली नोटिस
18
फक्त १ दिवस बाकी! क्रिकेटपटूंच्या महागड्या वस्तूंचा लिलाव; अनाथ मुलांसाठी मदतीचा हात
19
CM एकनाथ शिंदेंनी फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केलेला 'तो' खटला शिवसेनेनं समोर आणला
20
लेहमध्ये भीषण अपघात, ६ जणांच्या मृत्यूची भीती, स्कूल बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू; ट्रॅक्टरवर आदळून ट्रॅव्हल बस खड्ड्यात कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 7:04 AM

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ही ट्रॅव्हलर बस पंढरपूरकडे निघाली होती. या बसमधून ५४ वारकरी प्रवास करत होते. या अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वारकरी पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली.

या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून  ८ जण गंभीर जखमी आहेत, तर २० ते ३० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

ट्रॅक्टर क्रमांक एम एच 11 बिझेड 2286 वरील चालक तरवेज सलाउद्दीन अहमद (वय 28 वर्ष राहणार उत्तर प्रदेश ) हे मुंबई पुणे महामार्गावर नो एन्ट्री मध्ये पहिल्या लेनने ट्रॅक्टर चालवीत घेऊन जात होते. यावेळी जयश्री ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच 02 एफ जी 9966 चालक संजय पाटील (वय 54 वर्ष) हे आपल्या ताब्यातील बस मुंबई ते पंढरपूर चालवीत घेऊन जात असताना भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचे नादात पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रव्हल बस चालक यांचे बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार ठोकर मारून अपघात झाला. यावेळी शंभर फूट घासत नेऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर वरील  तरवेज सलाउद्दीन अहमद आणि अनोळखी इसम जागीच मयत झाले. बस ही ट्रॅक्टरला ठोकर मारून डाव्या साईटच्या रेलिंग तोडून 10 ते 15 फूट खाली जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली. 

टॅग्स :Accidentअपघात