नवी मुंबई ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:52 AM2018-07-16T02:52:49+5:302018-07-16T02:52:53+5:30
शुक्र वारी नवी मुंबईमधून, ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत रवाना झालेल्या दहा जणांनी रविवारी सुमारे ३५० कि.मी.चा प्रवास गाठत पांडुरंगाचरणी पर्यावरण वाचविण्याचे साकडे घातले.
पनवेल : शुक्र वारी नवी मुंबईमधून, ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत रवाना झालेल्या दहा जणांनी रविवारी सुमारे ३५० कि.मी.चा प्रवास गाठत पांडुरंगाचरणी पर्यावरण वाचविण्याचे साकडे घातले. तीन दिवसांत सायकलवरून ३५० कि.मी.चा प्रवास गाठून या वारकऱ्यांनी आपले ध्येय पूर्ण केले.
दहा जणांच्या पथकामध्ये पोलीस, वकील तसेच डॉक्टर या उच्चशिक्षित अधिकाºयांचा समावेश आहे. शुक्र वारी सकाळी ६ वाजता खारघर येथून दहा जणांचे पथक पंढरपूरकडे रवाना झाले होते. यामध्ये डॉ. अमर भिडे, लाचलुचपत विभागातील कन्हैया थोरात, रवींद्र क्षीरसागर, बाळासाहेब सावंत, अंकुश बांगर, वाल्मीक पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नीलेश थोटे, पोलीस हवालदार गणेश पवार, अनिल गीते, मिलिंद सकपाळ आदीचा समावेश आहे.
दहा जणांपैकी चार जण पुण्यात राहत असल्याने पुण्याहून या अनोख्या उपक्र मात सहभागी झाले. या प्रवासादरम्यान येणाºया गावातील ग्रामस्थांमध्ये वृक्षलागवड, पर्यावरण संरक्षण व तरु णांना प्रकृती स्वास्थाचे धडे या वेळी देण्यात आले.