पनवेलमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत; ३० जणांचे तोडले लचके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 07:39 PM2019-10-27T19:39:22+5:302019-10-27T19:40:38+5:30

ऐन सणासुदीला हा प्रकार घडल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Panic situation in Panvel due to Dog ; taken bites of 30 person | पनवेलमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत; ३० जणांचे तोडले लचके

पनवेलमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत; ३० जणांचे तोडले लचके

googlenewsNext
ठळक मुद्देपनवेलमधील जुनं तहसीलदार कार्यालय ते मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी परिसरात ही घटना घडली आहे.  पनवेल शहरात भटक्या कुत्र्याने ३० ते ३५ जणांना चावा घेतल्याने एकच खळबळ माजली आहे.

पनवेल - दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी पनवेल शहरात आलेल्या २५ ते ३० जणांचे भटक्या कुत्र्याने लचके तोंडल्याची घटना रविवारी घडली. पनवेल शहरात भटक्या कुत्र्याने ३० ते ३५ जणांना चावा घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. पनवेलमधील जुनं तहसीलदार कार्यालय ते मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी परिसरात ही घटना घडली आहे. शहरातील शिवाजी चौक परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या सफेद रंगाच्या  पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले. ऐन सणासुदीला हा प्रकार घडल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

पनवेल महानगर पालिकेच्या माध्यमातुन सध्याच्या घडीला कुत्र्याच्या निर्बीजीकरणावर कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही.दोन महिन्यापूर्वी  दर जास्त असल्याने कुत्र्यांचे निर्बीजीकरणाच्या टेंडरला स्थायी समितीने स्थगिती दिली आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली असल्याने शहरात गर्दी झाल्यास अशाप्रकारे मोकाट कुत्र्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेकडे याबाबत कोणतीच यंत्रणा नसल्याने हा त्रास वाढत चालला आहे. पालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला पाच हजारापेक्षा जास्त मोकाट कुत्रे आहेत. रविवारच्या घटनेने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणेज या घटनेत लहान मुलांना देखील गंभिर दुखापत झाली आहे.या कुत्र्याने ८ ते ११ वयोगातील चिमुकल्यांचे देखील आपले शिकार बनवले. यापैकी २४ जणांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत यासंदर्भात उपचार केले. इतर रुग्णानी खाजगी दवाखान्यात धाव घेत यासंदर्भात औषधोपचार केले.रात्री उशिरापर्यंत कुत्र्याने लचके तोडलेल्या नागरिकांचा आकडा वाढण्याची शल्यता वर्तविण्यात येत आहे.  संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याकरिता पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिली. 

Web Title: Panic situation in Panvel due to Dog ; taken bites of 30 person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.