पनवेल : 2004मध्ये कळंबोलीत सापडलेली 3 टन स्फोटकं निकामी करण्यासाठी लष्कर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 09:22 AM2017-10-06T09:22:57+5:302017-10-06T16:56:30+5:30
कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 मध्ये तीन कंटेनरमधून 3 टन दारुगोळा पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) ही स्फोटकं निकामी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
पनवेल - कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 मध्ये तीन कंटेनरमधून 3 टन दारुगोळा पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) ही स्फोटकं निकामी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी पुण्यातून सैन्य दलाचे जवान आणि कळंबोली पोलीस घटनास्थळी हजर आहेत.
जप्त करण्यात आलेल्या या स्फोटकांमध्ये रॉकेट लाँचर, हॅण्ड ग्रॅनाईट, हॅण्ड बॉम्ब तसेच अन्य दारुगोळा असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे. या ऑपरेशनदरम्यान कोणत्याही प्रकारे हानी घडू नये, यासाठी विशेष उपाय योजनादेखील हाती घेण्यात आल्या आहेत.
दारुगोळा ठेवलेल्या जागेपासून जवळपास असलेल्या आवळ्याचा मळा, मोसारा तसेच मानघर येथील रहिवाशांना घरं रिकामी करण्यात आदेश देण्यात आले आहेत. ही स्फोटके निकामी करण्यासाठी पुणे येथील सैन्य दलाचे जवान उपस्थित आहेत. बॉम्ब स्कॉडच्या मदतीने हा दारुगोळा निकामी केला जात आहे.
सकाळी 10.30 वाजल्यापासून जवळपास आठ स्पोट घडवण्यात आले आहेत. तसेच संध्याकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान 3 स्पोट घडवण्यात येणार आहेत
पहिला स्पोट सकाळी 10:30 वाजता
दुसरा स्पोट सकाळी 10: 45 वाजता
तिसरा स्पोट सकाळी 11 वाजता