पनवेल एपीएमसीत मतदान
By admin | Published: November 14, 2016 04:35 AM2016-11-14T04:35:49+5:302016-11-14T04:35:49+5:30
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीचे मतदान रविवारी शहरातील सरस्वती विद्यामंदिर या महानगरपालिकेच्या शाळेत पार पडले.
पनवेल : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीचे मतदान रविवारी शहरातील सरस्वती विद्यामंदिर या महानगरपालिकेच्या शाळेत पार पडले. यावेळी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी झाली असून भारतीय जनता पक्ष या आघाडीच्या विरोधात लढत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी ७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. यातील १० जागांवर या आधीच शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागांसाठी ८२२ मतदार, व्यापारी अडते मतदार संघातून २ जागांसाठी ६८४ मतदार, हमाली माथाडी मतदार संघातून १ जागेसाठी ११८ मतदार असे एकूण १६२४ मतदार मतदान करणार होते. मात्र प्रत्यक्षात १४६९ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ८९.३६ टक्के मतदान केले. सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. (वार्ताहर)