पनवेल परिसरात बसचे भाडे 11 रुपये, तर रिक्षावाले आकारतात 50 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:40 AM2020-11-27T00:40:50+5:302020-11-27T00:41:18+5:30

रिक्षाचालकांचे मीटर अपच, नागरिकांना कोरोना काळात सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंड

In Panvel area, bus fare is Rs 11, while rickshaw pullers charge Rs 50 | पनवेल परिसरात बसचे भाडे 11 रुपये, तर रिक्षावाले आकारतात 50 रुपये

पनवेल परिसरात बसचे भाडे 11 रुपये, तर रिक्षावाले आकारतात 50 रुपये

Next

अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : पनवेल परिसरातील रिक्षा व्यावसायिक मीटर न टाकता व्यवसाय करीत आहेत. मनमानी भाडे आकारणी केली जात असल्याने पनवेलकरांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

पनवेल शहरासह कळंबोली, कामोठे, खारघर, करंजाडे, विचूंबे, तळोजा परिसरात एनएमएमटी बस सेवा आहे. कमी भाडे असल्याने नागरिकांना प्रवास करणे सोईचे झाले आहे. मात्र शहरात बससेवेच्या कमी फेऱ्या असल्यामुळे नागरिकांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. कळंबोलीला पोहोचण्यासाठी बसला १३ रुपये लागतात. तेथे रिक्षाचालक ७० रुपये घेतात. रात्री १०० रुपयांची मागणी करतात. नियमानुसार रिक्षामध्ये मीटर सुरू असणे बंधनकारक आहे. परंतु पनवेल आणि सिडको वसाहतीत काही रिक्षाचालक भरमसाट भाडे प्रवाशांकडून आकारतात. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व संताप व्यक्त होत आहे. काही रिक्षा व्यावसायिकांना संपर्क साधला असता, त्यांनी वाढती महागाई व गुंतवणूक यापेक्षा रिक्षा व्यवसाय आता अजिबात न परवडणारा बनला असल्याचे सांगितले. 

पाच ठिकाणचे भाडे 
    रिक्षा     बस पनवेल ते करंजाडे     ५०     ११  
पनवेल ते कळंबोली     ७०     १३ 
खांदेश्वर ते विचूंबे     ६०     ११  
पनवेल ते नेरे     ६०     १३
पनवेल ते साईनगर     ५०     ११

अव्वाच्या सव्वा भाडे

करंजाडे येथे जाण्यासाठी ११ रुपये बसला लागतात. रिक्षा ३० ते ४० रुपये घेते. रात्रीच्या वेळी ते अव्वाच्या सव्वा भाडे आकारते. कोरोनच्या काळात हा मोठा फटका आहे.     - किरण माने, प्रवासी

चालकांकडून नियमांना बगल
चालकांकडून नियमांना बगल दिली जात आहे. विनामास्क फिरणे, काही रिक्षांमध्ये सॅनिटायझरचा वापर होत नाही. नियमापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.बस स्थानक, रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांची मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे.

तर कारवाई करणार

ठरवून दिलले भाडे रिक्षाचालक आकारत नसतील तर ते योग्य नाही. कोरोना काळात रिक्षा चालकांना दिलेल्या सूचनांचे पालन होत नसेल तर पाहणी करून कारवाई करण्यात येईल. - गजानन     ठोंबरे,     साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: In Panvel area, bus fare is Rs 11, while rickshaw pullers charge Rs 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.