पनवेलमध्ये पावसाचा २९ वर्षांतील विक्रम मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:44 PM2019-09-17T23:44:08+5:302019-09-17T23:44:18+5:30

रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे

Panvel breaks record of 29-year rainfall | पनवेलमध्ये पावसाचा २९ वर्षांतील विक्रम मोडीत

पनवेलमध्ये पावसाचा २९ वर्षांतील विक्रम मोडीत

Next

वैभव गायकर
पनवेल : रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मागील २० वर्षांपूर्वीच्या पावसाचा रेकॉर्ड तुटला आहे. यावर्षी पनवेलमध्ये ४७४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २६ जुलै २००५ मध्ये पनवेलमध्ये ३६४२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पावसाची नोंद होती.
पनवेल शहरात एक नव्हे तर तब्बल चार वेळा पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या पाहावयास मिळाल्या. पनवेलच्या ग्रामीण भागालाही या पावसाचा मोठा फटका बसला. या पूरसदृश स्थितीमुळे अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे ३५० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. काही जनावरेही या पावसामुळे दगावली होती. विशेषत: शेतीचे फार मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. शासनाकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, पावसाने झालेल्या नुकसानाच्या तुलनेत ही मदत तुटपुंजीच होती. पनवेलमध्ये झालेल्या विक्र मी पावसाचा फटका पटेल मोहल्ला, टपालनाका, गाढी नदीपात्राजवळील परिसर, बावनबंगला परिसर आदीसह शहरातील गाढी नदीपात्रालगतचे ठिकाण काळुंद्रे, कासाडी नदीलगतच्या ठिकाणांना बसला आहे. या नद्यांच्या लगत तीन ते चार फूट पाणी साचले होते. एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केलेल्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास लागणार उशीर, त्यातच सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पनवेलकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, २६ जुलै २००५ साली पडलेल्या पावसापेक्षा जास्त पर्जन्यमान २०१० मध्ये झाले होते. अद्याप महाराष्ट्रात परतीचा पाऊस दाखल झाला नसल्याने पावसाचा जोर सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
>२९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तुटला
पनवेल तालुक्यात यावर्षी ४७३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पाऊस पनवेल परिसरात पडला होता. मात्र, २०१९ मध्ये पडलेल्या पावसाने १९९० सालच्या पावसाचा विक्रम मोडीत काढला आहे.
>२६ जुलै २००५ पेक्षा जास्त पाऊस
२६ जुलै २००५ साली ३६४२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पनवेल, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, खांदेश्वर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. २०१९ साली जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
>हवामानातील बदलामुळे अशाप्रकारे अतिवृष्टी होत असते. सध्याच्या घडीला जगभरात अशाप्रकारे नवीन समस्या निर्माण झाली आहे, याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.
- डॉ. सुरेश दोडके,
शास्त्रज्ञ,
खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल

Web Title: Panvel breaks record of 29-year rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस