प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार; निसर्ग वादळ, कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 07:49 PM2020-08-10T19:49:14+5:302020-08-10T19:50:04+5:30
विशेष म्हणजे या काळात दत्तात्रेय नवले यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती.
पनवेल : कोविड 19 तसेच निसर्ग वादळ या आपत्तीच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करीत आपले कर्तव्य बजावणारे पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांचा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते 10 ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा अधिकारी निधी चौधरी, खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांनी उरण, पनवेल तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची काळात एकही सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे या काळात दत्तात्रेय नवले यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती.
कोविडने मुक्तता होताच नवले यांनी त्वरित आपला कार्यभार सांभाळत कर्तव्यावर रुजू झाले. निसर्ग चक्रीवादळात देखील नवले यांनी पनवेल, उरण तालुक्यात या दोन तालुक्यात नुकसानग्रस्तांना मदत पोहोचविण्यास कार्यतत्परता दाखविली. तसेच वादळात झालेल्या युद्धपातळीवर नुकसानाचा आढावा घेण्यास देखील नवले आघाडीवर होते. कोविड 19 व निसर्ग वादळाच्या कार्यकाळात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडल्याने प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांचा हा सत्कार करण्यात आला.रायगड जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला .