पनवेलच्या वीज ग्राहकांना मिळणार अखंडित वीज , महावितरणचा नवा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:49 AM2017-08-29T02:49:16+5:302017-08-29T02:49:32+5:30
महानगरपालिकेची स्थापना झाल्यामुळे पनवेलकरांना त्यानुसार सुविधा देण्याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले. इतर महापालिकेच्या धर्तीवर तीन महिन्यांत सुविधांचा पॅटर्न तयार करण्याबाबत अधिका-यांना सूचना देण्यात करण्यात आल्या
पनवेल : महानगरपालिकेची स्थापना झाल्यामुळे पनवेलकरांना त्यानुसार सुविधा देण्याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले. इतर महापालिकेच्या धर्तीवर तीन महिन्यांत सुविधांचा पॅटर्न तयार करण्याबाबत अधिकाºयांना सूचना देण्यात करण्यात आल्या, त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लवकरच महावितरण पालिकेच्या धर्तीवर सेवा देणार आहे.
पनवेल १५० वर्षे जुनी नगरपालिका होती. आता पनवेल महानगरपालिका स्थापन झाली आहे. त्यामुळे पनवेलला महानगराचा दर्जा प्राप्त झाला आहे. पूर्वी नगरपालिका आणि ग्रामपंचायत असताना वीज पुरवठा खंडित होत असे, त्याचबरोबर इतर अनेक त्रुटी होत्या. तसेच वीज वितरण व्यवस्था जुनी झाली होती. त्यामुळे पनवेल परिसरातील ग्राहकांना अखंडित वीज मिळत नव्हती. आता महानगरपालिका झाली तरी परिस्थीत सुधारणा झाली नाही, असा मुद्दा काशिनाथ पाटील यांनी ऊर्जामंत्र्यांसमोर जनता दरबारात उपस्थित केला होता. याविषयाकडे गांभीर्याने पाहात बानवकुळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांना पनवेलकरांना महानगराच्या सुविधा दिल्या जात आहेत का? असा सवाल केला; परंतु अधिकाºयांनी तसा दर्जा अद्याप दिला नसल्याचे कबूल केले. त्यानुसार मंत्री महोदयांनी तीन महिन्यांच्या आत स्टाफ पॅटर्नचा प्रस्ताव तयार करून तो सादर करण्याच्या सूचना केल्या. तळोजा एमआयडीसी व पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्र ार कारखानदारांनी जनता दरबारात केली. या ठिकाणी असणाºया रोहित्रांवरून इतरांना वीज दिली जात असल्याने आम्हाला वीज मिळत नसल्याचे विजय लोखंडे यांनी सांगितले. त्यानुसार दोन्ही ठिकाणच्या उद्योगांना अखंडित वीज पुरवठा होईल, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना महावितरणचे अधिकारी शिवाजी राठोड यांनी सांगितले की लवकरच महानगरपालिकेच्या धर्तीवर कार्यलय व व्यवस्थापन उपलब्ध करणार आहे.