शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पनवेलच्या वीज ग्राहकांना मिळणार अखंडित वीज , महावितरणचा नवा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:49 AM

महानगरपालिकेची स्थापना झाल्यामुळे पनवेलकरांना त्यानुसार सुविधा देण्याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले. इतर महापालिकेच्या धर्तीवर तीन महिन्यांत सुविधांचा पॅटर्न तयार करण्याबाबत अधिका-यांना सूचना देण्यात करण्यात आल्या

पनवेल : महानगरपालिकेची स्थापना झाल्यामुळे पनवेलकरांना त्यानुसार सुविधा देण्याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले. इतर महापालिकेच्या धर्तीवर तीन महिन्यांत सुविधांचा पॅटर्न तयार करण्याबाबत अधिकाºयांना सूचना देण्यात करण्यात आल्या, त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लवकरच महावितरण पालिकेच्या धर्तीवर सेवा देणार आहे.पनवेल १५० वर्षे जुनी नगरपालिका होती. आता पनवेल महानगरपालिका स्थापन झाली आहे. त्यामुळे पनवेलला महानगराचा दर्जा प्राप्त झाला आहे. पूर्वी नगरपालिका आणि ग्रामपंचायत असताना वीज पुरवठा खंडित होत असे, त्याचबरोबर इतर अनेक त्रुटी होत्या. तसेच वीज वितरण व्यवस्था जुनी झाली होती. त्यामुळे पनवेल परिसरातील ग्राहकांना अखंडित वीज मिळत नव्हती. आता महानगरपालिका झाली तरी परिस्थीत सुधारणा झाली नाही, असा मुद्दा काशिनाथ पाटील यांनी ऊर्जामंत्र्यांसमोर जनता दरबारात उपस्थित केला होता. याविषयाकडे गांभीर्याने पाहात बानवकुळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांना पनवेलकरांना महानगराच्या सुविधा दिल्या जात आहेत का? असा सवाल केला; परंतु अधिकाºयांनी तसा दर्जा अद्याप दिला नसल्याचे कबूल केले. त्यानुसार मंत्री महोदयांनी तीन महिन्यांच्या आत स्टाफ पॅटर्नचा प्रस्ताव तयार करून तो सादर करण्याच्या सूचना केल्या. तळोजा एमआयडीसी व पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्र ार कारखानदारांनी जनता दरबारात केली. या ठिकाणी असणाºया रोहित्रांवरून इतरांना वीज दिली जात असल्याने आम्हाला वीज मिळत नसल्याचे विजय लोखंडे यांनी सांगितले. त्यानुसार दोन्ही ठिकाणच्या उद्योगांना अखंडित वीज पुरवठा होईल, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना महावितरणचे अधिकारी शिवाजी राठोड यांनी सांगितले की लवकरच महानगरपालिकेच्या धर्तीवर कार्यलय व व्यवस्थापन उपलब्ध करणार आहे.