पनवेल फेस्टिव्हलला आजपासून सुरूवात, पहिल्या दिवशी अडीचशे कलाकारांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:51 AM2017-12-22T02:51:28+5:302017-12-22T03:03:38+5:30
रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडलगतच्या सर्कल मैदानावर दहा दिवस रंगणाºया फेस्टिव्हलची सुरुवात अडीचशे कलाकारांच्या उपस्थित होणार आहे. ते विविध कलागुणांचे सादरीकरण करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘लोकमत’ या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक आहे.
कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडलगतच्या सर्कल मैदानावर दहा दिवस रंगणाºया फेस्टिव्हलची सुरुवात अडीचशे कलाकारांच्या उपस्थित होणार आहे. ते विविध कलागुणांचे सादरीकरण करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘लोकमत’ या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक आहे.
पनवेल फेस्टिव्हलची सुरुवात शोभयात्रेने करण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने होणाºया कार्यक्र मात ढोल ताशे, सांस्कृतिक ग्रुप, कला पथक सहभागी होणार आहेत. या वेळी पारंपरिक वाद्यगजर होणार आहे. वेगवेगळे फ्युजन हे उद्घाटन समारंभाचे आकर्षण असणार आहे. शनिवारी ‘गर्जतो मराठी’ यामध्ये मराठी अस्मिता जपणारे नृत्य, संगीताचे कलाविष्कार सादर होणार आहेत. रविवारी ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४० मॉडल्स सहभागी होणार आहेत. सोमवारी २५ डिसेंबर रोजी ‘रोटरी क्लब आॅफ द एअर’ हा कार्यक्र म संपन्न होणार आहे. त्यामध्ये रोटरी सदस्य सहभाग घेतील त्यातून बेस्ट कपलची निवड करण्यात येईल. मंगळवारी संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनचरित्रावर आधारित सोनिया परचुरे यांचा नृत्याविष्कार होईल. २७ डिसेंबरला, ‘मिस्टर आणि मिस पनवेल’ हा कार्यक्रम होईल. २८ डिसेंबरला २२ कलाकार ग्रुप डान्स करतील, ‘कलर्स आॅफ इंडिया’ यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. हा कार्यक्र म २९ डिसेंबर रोजी संपन्न होईल. ३० आणि ३१ डिसेंबर रोजी अनुक्र मे ‘थ्री डी काना’, ‘मोक्ष’ हे शो सादर होणार आहेत. थ्री डी कानामध्ये तीन तासांत कृष्णलीला दाखवली जाणार आहे. रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी आणि रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, ‘लोकमत’चे पदाधिकारी, पनवेल शहरातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पनवेल फेस्टिव्हलचे खास आकर्षण
मनोरंजनासोबत अत्याधुनिक रेल्वे तंत्रज्ञानाची माहिती पार्थ-सौमित्र-कृष्णमै या साधकांनी भारतात तयार केलेल बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाचे मॉडेल ठेवण्यात येणार आहे. मामाच्या गावातून समुद्राखालून भरधाव वेगाने धावणाºया ट्रेनच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. स्वयंचलित सिग्नलिंग, इंटर लॉकिंग, मार्ग बदल आदी आरटीएमएस सिस्टीम पाहायला मिळणार आहे. या महोत्सवासाठी पनवेलकरांनी भेट देण्याचे आवाहन रोटरी क्लबचे चेअरमन संतोष आंबवणे यांनी केले आहे.