पनवेल - कर्जत रेल्वे लाइन जोमात; प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:50 IST2025-03-17T11:50:19+5:302025-03-17T11:50:39+5:30

मोहोपे स्टेशनवरून पहिल्या ‘एंड अनलोडिंग रेक’ची धाव...

Panvel - Karjat railway line Important milestone of the project passed | पनवेल - कर्जत रेल्वे लाइन जोमात; प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार

पनवेल - कर्जत रेल्वे लाइन जोमात; प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार

मुंबई : पनवेल आणि कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर असून शनिवारी त्यात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश मिळाले. या मार्गावर मोहोपे स्टेशनवरून पहिला ‘एंड अनलोडिंग रेक’ चालविण्यात आला. 

२६० मीटर लांब आणि ६० किलो वजन असलेल्या रेल पॅनेलची वाहतूक एंड अनलोडिंग रेकच्या माध्यमातून करण्यात आली. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. या रेकचा वापर करून पनवेल-कर्जत मार्गामध्ये लांब वेल्डेड रेल ट्रॅक बसविले जाणार आहेत. याआधी मध्ये रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात मिळविलेल्या रेकचा वापर करून मोहोपे - चिखलेदरम्यान ट्रॅक जोडण्याचे काम पूर्ण केले होते. आता डिझाइन केलेले रेक आल्यानंतर, नवीन ट्रॅक टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल.

 स्थानके 
या मार्गावर पनवेल, मोहोपे , चिखले, चौक, कर्जत ही स्थानके आहेत. 

कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण
मोहोपे - चिखले विभाग पूर्ण झाल्यानंतर कर्जत आणि चौक स्टेशन भागात रेल्वे जोडणी निर्माण केली जाणार आहे. लवकरच नवीन रेक मिळेल. पनवेल - कर्जत कॉरिडॉरवर कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे.

प्रकल्प वैशिष्ट्ये
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट- ३ अंतर्गत  या कॉरिडॉरचे काम सुरू.

गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण -
पनवेल ते कर्जतदरम्यान २९.६ किमी प्रकल्पाला २,७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 
कर्जत - पनवेल कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनेल. 
या कॉरिडॉरमुळे प्रादेशिक आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. 
मार्ग पूर्ण झाल्यावर प्रवासाच्या वेळेची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होईल. 

Web Title: Panvel - Karjat railway line Important milestone of the project passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे