पनवेल : पनवेल महापालिकेच्या दुसऱ्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ७ जानेवारीला अंतिम मुदत असल्याने इच्छुकांपैकी एका नावावर भाजप नेतृत्वाला शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापौरपदी कोण विराजमान होणार, याबाबत शहरवासीयांना उत्सुकता लागून राहिली आहे. महापौरपद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मराठा समाजाला या पदावर विराजमान होण्याची संधी चालून आली आहे. खुल्या महिला प्रवर्गातून भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी महिला बालकल्याण सभापती लीना अर्जुन गरड, संजना कदम यांचे नाव चर्चेत आहे. सुशिक्षित उमेदवार पनवेलच्या महापौरपदी विराजमान व्हावा याकरिता विविध संघटनांनी भाजप नेते रामशेठ ठाकूर यांची दोन दिवसांपासून भेट घेण्यास सुरुवात केली आहे.मागील काही दिवसांत खारघरमधील नगरसेविका लीना गरड यांच्या समर्थनार्थ ३० पेक्षा जास्त संघटनांनी रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देत गरड यांच्या समर्थनार्थ आपले पत्र दिले आहे. पनवेल तालुक्यात आगरी समाज मोठा आहे. मात्र शहरीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी स्थायिक झाला. अधिकारी, नोकरदार, कामगार तसेच माथाडी कामगारांच्या रूपाने पनवेल तालुक्यात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे वास्तव्य आहे. पहिल्यांदाच खुल्या गटातील महिला सदस्यासाठी आरक्षण पडल्याने महापौरपदासाठी नगरसेविका लीना गरड यांना संधी देण्याची मागणी सकळ मराठा समाजाच्या वतीने रामशेठ ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी सकळ मराठा समाजाचे विनोद साबळे, रामदास शेवाळे, गणेश कडू, बाळासाहेब फडतरे, संजय कंदारे, संतोष जाधव आदींसह शेकडो मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.>सकळ मराठा समाजाचे निवेदनपनवेल महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख मंगळवार, ७ जानेवारी आहे. तीन दिवसांत पनवेलला नवीन महापौर मिळणार आहे. दरम्यान मराठा समाजाचे नेतृत्व करणाºया सुशिक्षित उमेदवार लीना गरड यांना महापौरपदी विराजमान होण्याची संधी देण्याची मागणी भाजप नेते पनवेल तालुका सकळ मराठा समाजाने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे केली आहे.
पनवेलच्या महापौरपदी आज होणार शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 11:53 PM