पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त
By वैभव गायकर | Published: June 25, 2024 05:50 PM2024-06-25T17:50:54+5:302024-06-25T17:51:19+5:30
पनवेल महापालिकेकडून यावेळी सुमारे २१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
वैभव गायकर,पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या खारघर,कळंबोली, कामोठा या तीन प्रभागांमध्ये आज प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे 37 किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे 21 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज मोठी प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रभाग समिती 'अ ' खारघर प्रभागामध्ये रेल्वे स्टेशन येथे परिसरात प्लास्टिक पिशवी (सिंगल युझ प्लास्टिक) बंदी कारवाई दरम्यान रु ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला , या कारवाई मध्ये सुमारे ०५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.प्रभाग समिती ‘ब’ कलंबोली प्रभागामध्ये आज प्रभाग क्रमांक ९ आणि प्रभाग क्रमांक १० कळंबोली येथील भाजी मार्केट , फळ विक्रेते व हॉटेल व्यवसायिक यांच्यावरती प्लास्टिक पिशवी बंदी ( सिंगल युझ )कारवाई करण्यात आली , या कारवाई मध्ये अंदाजे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत कामोठा - कलंबोली विभागाच्या माध्यमातून आज खांदा कॉलनी वार्ड 14 व 15 येथील भाजी मार्केट व फळ विक्रेते व हॉटेल यांच्यावरती प्लास्टिक पिशवी ( सिंगल युझ ) बंदी कारवाई करण्यात आली , या कारवाई मध्ये अंदाजे 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व 5 हजार दंड वसूल करण्यात आला. सदर ठिकाणी मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड व स्वच्छता निरीक्षक , पर्यवेक्षक व स्वच्छता दूत उपस्थित होते.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या यांच्या सूचनेनुसार प्रतिबंधित प्लास्टीकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे.