शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर; महायुतीत वाद उफाळणार?
2
Hathras Stampede : "मी सत्संगला जाण्यापासून रोखलं पण..."; चेंगराचेंगरीत कुटुंब उद्ध्वस्त, काळजात चर्र करणारी घटना
3
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
4
बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी
5
हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही
6
Share Market Opening : सेन्सेक्सनं रचला इतिहास, पहिल्यांदाच ८०००० पार, निफ्टीही ऑल टाईम हायवर
7
मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी
8
Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय
9
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण
10
ललित मोदीची मुलगी आलिया व्यवसायात आजमावतेय नशिब; माहितीये कोणत्या कंपनीची आहे मालकीण?
11
धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले
12
रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक
13
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी
14
MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल
15
बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा
16
आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
17
नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती
18
दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता
19
जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं! लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला, पण आज..
20
...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय

पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त

By वैभव गायकर | Published: June 25, 2024 5:50 PM

पनवेल महापालिकेकडून यावेळी सुमारे २१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

वैभव गायकर,पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या खारघर,कळंबोली, कामोठा या तीन प्रभागांमध्ये आज प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे 37 किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे 21 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज मोठी प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रभाग समिती 'अ '  खारघर प्रभागामध्ये रेल्वे स्टेशन येथे परिसरात प्लास्टिक पिशवी (सिंगल युझ प्लास्टिक) बंदी कारवाई दरम्यान रु ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला , या कारवाई मध्ये सुमारे ०५  किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.प्रभाग समिती ‘ब’  कलंबोली प्रभागामध्ये आज  प्रभाग क्रमांक ९ आणि प्रभाग क्रमांक १० कळंबोली येथील भाजी मार्केट , फळ विक्रेते व हॉटेल  व्यवसायिक यांच्यावरती प्लास्टिक पिशवी बंदी ( सिंगल युझ )कारवाई  करण्यात आली , या कारवाई मध्ये अंदाजे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत कामोठा - कलंबोली विभागाच्या माध्यमातून आज  खांदा कॉलनी वार्ड 14 व 15  येथील भाजी मार्केट व फळ विक्रेते व हॉटेल यांच्यावरती प्लास्टिक पिशवी ( सिंगल युझ ) बंदी कारवाई करण्यात आली , या कारवाई मध्ये अंदाजे 22  किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व  5 हजार दंड वसूल करण्यात आला. सदर ठिकाणी मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड व स्वच्छता निरीक्षक , पर्यवेक्षक व स्वच्छता दूत उपस्थित होते.

 पनवेल महापालिका क्षेत्रात  एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे. उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या यांच्या सूचनेनुसार प्रतिबंधित प्लास्टीकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :panvelपनवेलPlastic banप्लॅस्टिक बंदी