पनवेल : पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी मंत्रालयावर लाँग मार्च काढला. आंदोलनाची दखल घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. कामगारांच्या समावेशनाचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुढील एक महिन्यात हा प्रश्न सोडविण्याचेआश्वासन या वेळी शिष्टमंडळाला देण्यात आले.तीन वर्षांपासून पालिकेत समावेशन होत नसल्याने या कामगारांनी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मागील दहा दिवसांपासून या कर्मचाºयांनी पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र, शासनामार्फत काहीच दखल घेतली जात नसल्याने या कर्मचाºयांनी बुधवारी शासनाविरोधात लाँग मार्च पुकारत मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला.या मोर्चाला आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शविला. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे स्वत: या या मार्चमध्ये सहभागी झाले. आंदोलनाच्या सोबत तेही या मोर्चात पायी चालत सहभागी झाले. बाळाराम पाटील व माजी आमदार मनोहर भोईर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना या मार्चबद्दल माहिती दिली. त्यांनी हा विषय सामंजस्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. या वेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीदेखील पुढाकार घेतला. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींसह कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष जाधवही उपस्थित होते.या बैठकीत नगरविकास खात्याच्या अधिका-यांनी पहिल्या टप्प्यात ३२० पैकी १४६ कर्मचाºयांच्या समावेशनला अनुकूलता दाखविली. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून ३२० कर्मचाºयांच्या समावेशनाच्या मागणीवर ठाम भूमिका घेतल्यांनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात कर्मचाºयांच्या समावेशनाचा निर्णय घेण्याचे आदेश नगरविकास खात्याच्या अधिका-यांना दिले.या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लेखी आश्वासन दिल्यांनतर कर्मचाºयांनी काढलेल्या लाँग मार्चला स्थगिती देण्यात आली.पालिकेच्या कामकाजावर परिणामपनवेल महानगरपालिकेतील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारत या लाँग मार्च आंदोलनात सहभाग घेतला. याचा परिणाम पालिकेतील कामकाजावर झाल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले. प्रशासकीय स्तरावर कर्मचारी उपस्थित नसल्याने पालिकेतील विविध कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते.नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कर्मचाºयांच्या समावेशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी समावेशनाबाबत लेखी आश्वासन आम्हाला दिले आहे, त्यामुळे आमची लढाई यशस्वी झाली आहे. सर्वपक्षीय नेते यांचे आम्ही आभार मानत आहोत.- अॅड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष,म्युनिसिपल एम्पलॉइज युनियन
पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, प्रश्न सोडविण्याचे नगरविकासमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 2:13 AM