पनवेल : पनवेल शहर महापालिकेच्या बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडले. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या या बोधचिन्ह व ब्रीदवाक्याचे अनावरण शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नसल्याने भाजपा नगरसेवकांनी कार्यक्रमाला दांडी मारली.पालिकेने बोधचिन्हासाठी विशेष स्पर्धा घेतली होती. स्पर्धेत २४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. पैकी उत्कृष्ट बोधचिन्ह दिलेल्या ५ कलाकारांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कलाकारांना ५ हजार रुपयांचे बक्षीसही देण्यातआले.कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव, गटनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी तसेच पनवेलकर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.>‘जनहित परम धेय्यम’ हे महापालिकेचे ब्रीदवाक्य असून प्रशासन याच ध्येयाने काम करीत आहे. सर्वसमावेशक बोधचिन्ह पनवेल महानगरपालिकेचे असून सर्वांना ते नक्कीच आवडेल.- डॉ. सुधाकर शिंदे,आयुक्त, पनवेल महानगरपालिका>कलाकारांना ५000 रु पये पारितोषिक१) जितेश पोशा हुद्दार २) संतोष नारायण डांगरे३) शैलेश अंकुश चिबीरे ४) विवेक मेघश्याम भगत५) प्रनेश मारुती म्हात्रे
पनवेल महापालिकेच्या बोधचिन्हाचे अनावरण, भाजप नगरसेवकांची कार्यक्रमाला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 2:35 AM