पनवेल नगरपरिषदेवर आज ‘कफ’चा मोर्चा

By admin | Published: August 13, 2015 12:31 AM2015-08-13T00:31:14+5:302015-08-13T00:31:14+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये पनवेलकरांना अनेक नागरी तसेच पायाभूत सुविधा भेडसावत आहेत. याबाबत ‘कफ’ तसेच अन्य सामाजिक संस्थांनी वारंवार तक्रारी करूनही पनवेल नगरपरिषदेकडून

On the Panvel Municipal Council, today's 'cuff' front | पनवेल नगरपरिषदेवर आज ‘कफ’चा मोर्चा

पनवेल नगरपरिषदेवर आज ‘कफ’चा मोर्चा

Next

पनवेल : गेल्या काही वर्षांमध्ये पनवेलकरांना अनेक नागरी तसेच पायाभूत सुविधा भेडसावत आहेत. याबाबत ‘कफ’ तसेच अन्य सामाजिक संस्थांनी वारंवार तक्रारी करूनही पनवेल नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याने गुरुवार, १३ आॅगस्ट रोजी कफ व इतर ५० संस्था नगरपरिषदेवर मोर्चा काढणार आहेत.
पनवेलमध्ये अपुरा पाणीपुरवठा, गटारे, नाले व रस्ते यांची सफाई व दुरुस्ती, कचऱ्याचे निर्मूलन, अनधिकृत फेरीवाले, पथदिवे, वाहतूक व्यवस्था, पार्किंगची समस्या, खेळण्याची मैदाने, भुयारी गटार योजना, बॅनरबाजी आदी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ५० संस्थांच्या सह्या घेवून याबाबतचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिले होते. मात्र निवेदनाला नगरपरिषदेने कोणताच प्रतिसाद दिला नसल्यामुळे गुरुवारी सकाळी ११ वा. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापासून नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Web Title: On the Panvel Municipal Council, today's 'cuff' front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.