शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

पनवेल महानगरपालिका मालमत्ता हस्तांतरण प्रणाली अधिक गतिशील; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन 

By वैभव गायकर | Published: January 05, 2024 7:27 PM

Panvel News: पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ  दि.5 रोजी माणगाव येथे पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

- वैभव गायकरपनवेल - पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ  दि.5 रोजी माणगाव येथे पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रात ही सुविधा राबविणारी पनवेल महानगरपालिका ही पहिली  महानगरपालिका आहे.

व्यवसायपूरकता या उपक्रमांतर्गत नागरी स्वराज्य संस्थामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा (इंटिग्रेटेड वेब बेस्ड पोर्टल) मार्फत एकात्मिक स्वरूपात सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर त्या मालमत्तेची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि करदाता अभिलेख (टॅक्स पे रेकॉर्ड) यांवरती नोंद केली जाते. महापालिका देणार असलेल्या या नवीन सुविधेअंतर्गत महापालिका हद्दीतील मालमत्ता खरेदी- विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे  नोंद करताना महानगरपालिकेच्या कर देयकावरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक आपल्या दस्तामध्ये नोंद करणे आवश्यक असणार आहे. तसेच मालमत्ताधारकांनी मालमत्ता खरेदी करताना मालमत्तेचा मालमत्ता कर थकबाकीसह पूर्ण भरणा केलेबाबत खातरजमा करुन पावती आपल्या दस्तास जोडणे आवश्यक आहे.यामुळे मालमत्ताधारकांनी आपल्या नोंदणीदस्तामध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक नमूद केल्यास आपले नाव महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीत तात्काळ दाखल होणार आहे. यामुळे खरेदीदाराला पालिकेकडे करदाता म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही, तसेच मालमत्ताधारकांना आपले स्वत:चे कर देयक पालिकेच्या वेबसाईटवरती सहजरित्या उपलब्ध  होणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक  गणेश देशमुख यांनी दिली आहे. या सुविधेचा पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होणार आहे. सहाय्यक निबंधक पनवेल यांच्या कार्यालयामध्ये देखील या सुविधेची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहे जेणे करून याबाबत मालमत्ताधारकांमध्ये याबाबत माहिती मिळेल.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र. अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, प्रशांत ठाकुर,विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. पनवेल महापालिकेचा स्वयंचलित पद्धतीने करदाता नोंद करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता खरेदी केल्यावर मालमत्ता देयकांवर नावाचा फेरफार करण्यासाठी स्वत:ला पालिकेमध्ये जाण्याची गरज राहणार नसून. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. एका बाजुला पालिकेचा प्रशासकीय वेळ आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकाचा वेळ वाचणार आहे. हा दुहेरी फायदा होणार आहे.- एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री )या नवीन सुविधेमध्ये पालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी मालमत्ता कर पूर्ण भरला आहे की नाही यांची  खात्री करावी. तसेच खरदी विक्री दस्तांमध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक(युपिक आयडी नंबर) नमुद करावा जेणे करून दस्तांची नोंदणी झाल्यावरती महापालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये खरेदीदाराच्या नावाचा तात्काळ समावेश होईल. - गणेश देशमुख (आयुक्त तथा प्रशासक ,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेलEknath Shindeएकनाथ शिंदे