पनवेल : अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे पनवेल महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ६२ लाख रु पये जमा झाले आहेत. गेल्या १५ महिन्यांपासून पालिकेने परिसरात केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे.पनवेल पालिकेची स्थापना होऊन १५ महिने उलटून गेले आहेत. पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा आदी परिसराला अतिक्र मणाचा विळखा पडला होता. वाढत्या हातगाड्यांमुळे पनवेल शहराचे नाव बदनाम होऊ लागले होते. पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल परिसरातील अतिक्र मण विरोधी पथके तयार करून अनधिकृत बॅनरबाजी, हातगाड्या, पत्र्याचे शेड, वाढीव बांधकाम, फुटपाथ आदींवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारत दंडात्मक कारवाई केली. १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत पालिकेने ३६ लाख ६५ हजार ९२० रु पये दंड वसूल केला, तर १ एप्रिल ते डिसेंबर २०१७ पर्यंत १ कोटी २५ लाख ३६ हजार रु पये वसूल केले आहेत. दंडात्मक कारवाईमुळे गेल्या १५ महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत १ कोटी ६२ लाख रु पये जमा झाले आहेत.पनवेल शहर व परिसरात बॅनरबाजीमुळे विद्रूपीकरण करण्यात येत होते. वाढदिवस, लग्न, साखरपुडा, नियुक्ती आदींचे फलक संपूर्ण पनवेल परिसरात लावून शहराचे विद्रूपीकरण केले जात होते. जागोजागी शुभेच्छांचे फलक निदर्शनास येत असत. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर आदी महापालिका हद्दीत अतिक्र मण वाढले होते. फुटपाथवर दुकाने थाटली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी अतिक्र मण विरोधी मोहीम सुरू केल्यामुळे कित्येक वर्षे अतिक्र मणाच्या विळख्यात सापडलेले रस्ते, फुटपाथ, चौक मोकळे झाले आहेत. हातगाड्या, पत्र्याचे शेड, वाढीव बांधकाम, मच्छी विक्रे ते आदींनी कारवाईच्या भीतीने अतिक्रमण स्वत:हून हटविले. तसेच ज्यांनी काढले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. सायन- पनवेल महामार्गाला जोडणाºया खांदा वसाहत येथील रस्त्यावरील अनधिकृत दुकाने, गाळे यांच्यावर कित्येक वर्षे कारवाई होत नव्हती. महामार्गावर केलेल्या कारवाईत बेकायदेशीर गाळे, लहान हॉटेल, वाइन शॉप जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईमध्ये कलिंगडविक्रे त्यांचे गाळे, फर्निचर विक्रे त्यांचे गाळे, ढाबा, वाइन शॉप आणि छोटे-मोठे हॉटेल, नर्सरीवर कारवाई करण्यात आली होती. अतिक्रमण करणाºयांकडून पालिकेने १ कोटी ६२ लाख रुपये वसूल केले आहेत.
पनवेल महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ६२ लाखांचा महसूल, पंधरा महिन्यांत विक्रमी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:08 AM