शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पनवेल पालिका क्षेत्रात श्वान निर्बीजीकरणाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:19 AM

निविदेला मंजुरी; स्थायी समितीत निर्णय

पनवेल : पनवेल पालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा विषय चांगलाच गाजला. या अनुषंगाने शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत निविदेला मंजुरी देण्यात आली आहे.स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्याने प्रवीण पाटील यांच्या जागी प्रभारी सभापती म्हणून परेश ठाकूर यांनी काम पाहिले. या वेळी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी केवळ एकच निविदा पालिकेला प्राप्त झाली होती. संबंधित इन डिफेन्स आॅफ अ‍ॅनिमल या कंत्राटदारामार्फत जादा दर आकारले जात असल्याने त्याच्या निविदा मंजुरीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी पनवेल परिसरात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातल्याने लवकरात लवकर निर्बीजीकरणाची गरज लक्षात घेत शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समिती सभेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता प्रतिश्वान १३९० रुपये आकारणी ही संस्था करणार आहे.पालिका क्षेत्रात सुमारे ५००० ते ५५०० भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. मागील वर्षभरापासून निर्बीजीकरण बंद असल्याने या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निविदेला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर निर्बीजीकरणाला सुरुवात करण्याचे आदेश या वेळी प्रभारी सभापती परेश ठाकूर यांनी दिले.नवीन पनवेल येथील पोदी स्मशानभूमीजवळ पालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या सात वेगवेगळ्या खोल्यामध्ये निर्बीजीकरण केले जाणार आहे. सभेत पालिकेचे लेखाधिकारी मनोजकुमार शेट्टे यांनी पनवेल महापालिकेचे बँक खाते पीएमसी बँकेतच का उघडले? याबाबतही चर्चा करण्यात आली.भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निर्बीजीकरणासाठी मागविलेल्या निविदेला योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने ही निविदाप्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारच्या सभेत याबाबत निर्णय घेऊन निर्बीजीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरात लवकर निर्बीजीकरणाला सुरुवात होणार आहे.- परेश ठाकूर, प्रभारी सभापती, स्थायी समिती, पनवेल महापालिकाअसे करणार निर्बीजीकरणकुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला आठवडाभरात सुरुवात होणार आहे. ज्या विभागात जास्त कुत्रे आहेत, याची तक्रार प्राप्त होताच संबंधित कंत्राटदारामार्फत कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण केंद्रात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले जाईल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात कुत्र्यांना सोडले जाणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर श्वानांवर एक खूण केली जाणार आहे.