मृतांच्या अंत्यविधीचा खर्च पनवेल पालिका उचलणार; स्थायी समितीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:12 PM2020-09-10T23:12:03+5:302020-09-10T23:12:24+5:30

प्रस्ताव मंजूर

Panvel Municipality will bear the cost of the funeral of the deceased; Approval of the Standing Committee | मृतांच्या अंत्यविधीचा खर्च पनवेल पालिका उचलणार; स्थायी समितीची मान्यता

मृतांच्या अंत्यविधीचा खर्च पनवेल पालिका उचलणार; स्थायी समितीची मान्यता

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीचा खर्च पालिका उचलणार आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने तसेच अनेक वेळा अंत्यविधीला कोणीच उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळत असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत स्वखर्चाने कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आहे.

पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने १४ हजारांचा टप्पा गाठला आहे. यापैकी १८५० च्या आसपास विद्यमान कोरोना रुग्ण आहेत. उर्वरित ११,५०० पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. मृतांचा आकडा ३२४ वर गेला आहे. कोरोनामध्ये मृत पावणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा रुग्णांच्या अंत्यविधीवेळी मृतांचे नातेवाईक तसेच अंत्यविधी करणाºया कर्मचाऱ्यांचे खटके उडत असतात. अनेकांनी कोविड आजारातील मृतांवर मोफत अंत्यविधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने कोविड रुग्णांवर पालिकेच्या माध्यमातून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीनेदेखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

अंत्यविधीसाठी गॅस शवदाहिनीचा वापर केल्यास २५०० तर लाकडांचा वापर केल्यास पाच हजार रुपयांचा खर्च येतो. हा खर्च पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. सध्याच्या घडीला पोदी स्मशानभूमी व अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी कोविड रुग्णांवर अंत्यविधी केला जातो.

कोविडने मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीचा खर्च पालिकेमार्फत करण्याची मागणी आमच्याकडे येत होती. या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- सुधाकर देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Panvel Municipality will bear the cost of the funeral of the deceased; Approval of the Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.