- वैभव गायकर पनवेल - महिनाभर उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली आहे.पनवेल मधील नद्या या दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दोन दिवसात पनवेल तालूक्यात 150 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील खार जमीन संशोधित केंद्रात गुरुवारी 5.20 मिमी तर शुक्रवारी सकाळी 129.4 मिमी पर्यंत पावसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती संशोधन केंद्राचे डॉ के पी वैद्य यांनी पावसाचा जोर दिवसभर सुरु असल्याने संपूर्ण दिवसभरात 200 मिमी पर्यंत पावसाची नोंद एकट्या पनवेल तालुक्यात होण्याची शक्यता आहे.पनवेल मध्ये सध्याच्या पाऊस भातशेतीसाठी पूरक मानला जात आहे.महिनाभरानंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.