पनवेलमध्ये डुकरांचा वावर कायम

By admin | Published: August 25, 2015 12:53 AM2015-08-25T00:53:15+5:302015-08-25T00:53:15+5:30

तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूची साथ फोफावत आहे. शहरामध्ये या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण आढळले असून डुकरांपासून स्वाइन फ्लूच्या एच१एन१ या विषाणूची लागण होते.

In Panvel, the pig breeding continued | पनवेलमध्ये डुकरांचा वावर कायम

पनवेलमध्ये डुकरांचा वावर कायम

Next

पनवेल : तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूची साथ फोफावत आहे. शहरामध्ये या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण आढळले असून डुकरांपासून स्वाइन फ्लूच्या एच१एन१ या विषाणूची लागण होते. पनवेल शहरामध्ये डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित डक्ुकर मालकांना १४ आॅगस्टला नोटिसा पाठवून ४८ तासात डुकरांचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिले होते. मात्र ४८ तास उलटूनही शहरात डुकरांचा वावर कायम असल्याने शहरात स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरामधील डुकर पालनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र पालिकेच्या या नोटिसांना केराची टोपली दाखविली असल्याचीच परिस्थिती शहरात पहावयास मिळत आहे.
तालुक्यात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या २६ असून ९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. या रुग्णांमध्ये सर्वात जास्त संख्या पनवेल शहरातील रुग्णांची आहे. पनवेलमध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८ आहे. तर संशयित रुग्णांची संख्या १५ आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने सतर्क होवून त्वरित डुकरांचे पालन करणाऱ्या शहरामधील १२ व्यावसायिकांना नोटिसा पाठवून डुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते. शहरात डुकरांची संख्या शंभरच्यावर आहे. यापैकी काही डुकरांची संख्या कमी झाली मात्र आजही शहरात डुकर सर्रास फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत स्वाइन फ्लूच्या साथीवर नियत्रंण ठेवण्यासाठी १३ जणांच्या विशेष पथकाची स्थापना केली आहे. नियमित फवारणी, जंतुनाशक फवारणी आदी जबाबदारी संबंधित पथकावर देण्यात आली आहे. शहरात जनजागृती म्हणून नगरपरिषदेच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृतीपर फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांनी देखील पुढाकार घेतला आहे.
पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉॅ. बी.एस.लोहारे यांनी स्वाइन फ्लूच्या लक्षणांची शंका आल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात अथवा ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. घशात खवखव, ताप येणे, डोकेदुखी, थकवा, खोकला आदी स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. (प्रतिनिधी)

आमच्यामार्फत सतत यासंदर्भात पाठपुरावा सुरु आहे. काही डुक्कर व्यावसायिकांनी शहरातून डुकरांचा बंदोबस्त केला आहे. यासंदर्भात पुन्हा पाहणी करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू.
- डॉ. दिलीप कदम,
आरोग्य अधिकारी,
पनवेल नगरपरिषद

Web Title: In Panvel, the pig breeding continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.