Panvel: पनवेल मध्ये पावसाचा जोर वाढला, दोन दिवसांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद
By वैभव गायकर | Published: July 19, 2023 11:06 AM2023-07-19T11:06:02+5:302023-07-19T11:06:34+5:30
Panvel: पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढला असुन तालुक्यातील गाढी,कासाडी नद्या दुथडी वाहत आहेत.दोन दिवसात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे.
- वैभव गायकर
पनवेल - पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढला असुन तालुक्यातील गाढी,कासाडी नद्या दुथडी वाहत आहेत.दोन दिवसात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे. सखल भागात पाणी साचल्याने नोकरकदार वर्गाला कामावर जाण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.मात्र सुट्टी उशिरा जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी सकाळी शाळेत गेले.पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे, मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे.सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच स्थानकात गाड्या येण्यास विलंब होत असल्याने ही गर्दी झाली आहे.मुसळधार पाऊस पडत असल्याने तांत्रिक कारणामुळे उपनगरीय रेल्वेसेवा थांबविली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.यामध्ये कोण सावळा रोड तसेच ग्रामीण भागातील रस्त्याचा समावेश आहे.