Panvel: खारघर मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली ;तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका   

By वैभव गायकर | Published: July 21, 2024 08:00 PM2024-07-21T20:00:39+5:302024-07-21T20:00:54+5:30

Panvel News: दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.काही घरात पाणी शिरले असुन खारघर सेक्टर 5 मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भींत कोसळल्याने सोसायटी मधील तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे.

Panvel: Safety wall of Cauvery society in Kharghar collapses; 56 flat holders in three wings at risk    | Panvel: खारघर मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली ;तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका   

Panvel: खारघर मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली ;तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका   

- वैभव गायकर
पनवेल - दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.काही घरात पाणी शिरले असुन खारघर सेक्टर 5 मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भींत कोसळल्याने सोसायटी मधील तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे.

खारघर हिल वरून वाहून येणा-या पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाच्या जोरामुळे हि भिंत वाहून गेली आहे.226 फ्लॅट्स असलेल्या या चार मजली सोसायटीच्या जी,एच आणि आय या तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना यामुळे धोका निर्माण झाला असुन या रहिवाशांना सोसायटीच्या इतर सिरक्षित भागात स्थलांतरित करण्यात आले आहे.शेकाप नेते देवेंद्र मढवी यांनी हि बाब स्थानिक पोलीस प्रशासन,पालिका आणि सिडको प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिकेचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.पालिकेची पाच जणांची टीम याठिकाणी कार्यरत राहणार आहे.आयुक्त मंगेश चितळे यांनी देखील घटनेचा आढावा घेत तत्काळ प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना घटनास्थळी भेट देण्याची सूचना करीत गरज भासल्यास येथील रहिवाशांना पालिकेच्या शाळेत सुरक्षित रित्या स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.अतिवृष्टीमुळे सोसायटीची सुरक्षा भिंत वाहून गेली असून मागच्या वर्षी देखील अशीच घटना घटना घडली असल्याचे कावेरी सोयायटीचे अध्यक्ष शुभम जाधव यांनी सांगितले.

पालिका जेवणाची व्यवस्था करणार 
सोसायटीच्या तीन विंग ला लागुन असलेल्या या सोसायटीतील 56 फ्लॅट धारकांना तात्पुरते स्वरूपात सोसायटीच्या भागात स्थलांतरित करण्यात आले असुन आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार या रहिवाशानाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.या रहिवाशांची जेवणाची व्यवस्था पालिका करणार असल्याची माहिती प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी दिली.

Web Title: Panvel: Safety wall of Cauvery society in Kharghar collapses; 56 flat holders in three wings at risk   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.