शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

पनवेल ते बेलापूर : २५ रुपयांच्या प्रवासासाठी ३०० रुपयांची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 5:16 AM

इको, रिक्षाचालकांकडून लूट, रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल

अरुणकुमार मेहेत्रे

कळंबोली  : लोकलच्या हार्बर मार्गावरील दोन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे सोमवारीसुद्धा प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. रविवारी मेगाब्लॉक तसेच मालगाडी रुळांवरून घसरल्याने दुहेरी संकटामुळे  प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रविवारसह सोमवारी जैसे थे परिस्थिती असल्याने  रिक्षाचालकांनी प्रवाशांची अडवणूक करून  पंधरा किमीसाठी २५० ते ३०० रुपयांची मागणी करत जादा पैसे उकळले.

सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत रेल्वेचा मेगाब्लॉक घेतला होता. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असली तरी गावी जाणारे तसेच गावाकडून मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांना या मेगाब्लॉकमुळे नाहक त्रास सहन करावा लागला.

सोमवारी सकाळपासूनच एसटी बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर सीबीडी बेलापूरपासून मुंबईसह ठाणे जाण्यासाठी लोकल सेवा सुरळीत सुरू होती. मात्र, पनवेल ते सीबीडी बेलापूरपर्यंतची लोकल वाहतूकबंद केल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

इको चालकांचाही धंदा तेजीत

 सोमवारी सकाळपासूनच इको चालकांचा  मोर्चा सीबीडी बेलापूरकडे वळवला होता.

 मुंब्रा, कल्याण चालणाऱ्या इको सीबीडी बेलापूरपर्यंत प्रवासी भाडे  आकारले.

 त्यात प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड सोसावा लागला.

मेगाब्लॉकमुळे सीबीडी बेलापूरपर्यंत रिक्षाचालक २५० ते ३०० रुपये

घेत आहे. अडवणूक करून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. याकडे वाहतूक पोलिस लक्ष देत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांचे दोन दिवस फावले आहे. याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागला.       - अनिल पाटील, प्रवासी 

सोमवारी सकाळी पनवेल बसस्थानकातही प्रचंड गर्दी झाली होती. गाड्या खचाखच भरल्या जात होत्या. त्यामुळे प्रवास करणे कठीण झाले होते. त्यात खासगी वाहनांकडून अडवणूक करत जादा पैशांची मागणी करण्यात आली. रिक्षाचालकाकडून  ३०० रुपये घेतले जात होते. अशी अडवणूक चुकीची आहे. 

              - अमोल साळुंखे, प्रवासी

 एसटीने २५ रुपयांत  सीबीडी बेलापूर गाठता येत होते. मात्र, गर्दीमुळे खासगी वाहनांचा अनेकांना आधार घ्यावा लागला.

लोकल सेवा प्रभावित झाल्याने सोमवारी लेकुरवाळ्या महिला आणि ज्येष्ठांचे प्रचंड हाल झाले. पनवेलमधून ठाणे आणि दादरला जाण्यासाठी अनेकांनी एसटी महामंडळाच्या बसेसचा आधार घेतला.

त्यामुळे त्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. बसेस क्षमतेपेक्षा अधिक भरून जात असल्याने अनेकांना जीवघेणी कसरत करत उभ्यानेच तब्बल दीड तासाचा प्रवास करावा लागला.

मर्यादित बसेस आणि बेसुमार गर्दीचा फायदा घेत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांची अक्षरश: लूट केली.

बेलापूर स्थानकापासून पनवेलपर्यंत बसेस सोडण्यात येत असल्या तरी गर्दीच्या तुलनेत बसेसची संख्या कमी होती. त्यामुळे बसमध्ये प्रवासी कोंबले होते. नागरिकांना तसाच प्रवास करावा लागला. अनेक बसेस या जुन्या असल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी रात्री काही बसेस रस्त्यात नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.