आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलकर नाराज, संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे रद्दची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:31 PM2020-05-20T23:31:28+5:302020-05-20T23:31:47+5:30

पनवेल महानगरपालिकेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात बदली झालेले गणेश देशमुख हे तिसरे आयुक्त. यापूर्वी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे, राजेंद्र निंबाळकर यांनी धुरा सांभाळली आहे.

Panvelkar angry over transfer of commissioner | आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलकर नाराज, संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे रद्दची मागणी

आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलकर नाराज, संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे रद्दची मागणी

Next

- वैभव गायकर।

पनवेल : कोरोनामुळे देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असताना पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अचानक ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पानवेलकरांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
पनवेल महानगरपालिकेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात बदली झालेले गणेश देशमुख हे तिसरे आयुक्त. यापूर्वी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे, राजेंद्र निंबाळकर यांनी धुरा सांभाळली आहे. पनवेल महानगरपालिकेचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचीदेखील तत्कालीन भाजप सरकारने तडकाफडकी बदली केल्याने पनवेलकरांमध्ये नाराजी पसरली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत महाविकास आघाडी सरकारनेदेखील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख यांची मुदतपूर्व बदली केल्याने याचे पडसाद पनवेलच्या विकासावर उमटणार आहेत.
स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर पनवेल संघर्ष समिती आदीसह अनेक संघटनांनी ही मागणी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

Web Title: Panvelkar angry over transfer of commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल