शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पनवेलकरांना मिळणार कोंढाणातून पाणी

By admin | Published: April 09, 2017 3:00 AM

सिडकोच्या माध्यमातून कोंढाणा धरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात नैना क्षेत्राची तहान भागविण्यासाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे.

पनवेल : सिडकोच्या माध्यमातून कोंढाणा धरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात नैना क्षेत्राची तहान भागविण्यासाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे. तसेच पनवेलकरांनाही त्यातून अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. पनवेल तालुक्यातील विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली, आदई या ग्रामपंचायतींना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको, एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका आणि एमजेपीकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात एक संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीला संबंधित प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.पनवेल महानगरपालिका हद्दीच्या जवळ असलेल्या विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली व आदई या ग्रामपंचायतींमधील गावांचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे लोकसंख्याही वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. जानेवारीपासून पाणीपुरवठ्यात आणखी कपात करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्यावर या गावांना विसंबून राहवे लागते. या पार्श्वभूमीवर या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी आमदार प्रशांत पाटील यांनी या बैठकीत केली. तसेच सिडकोच्या नैना क्षेत्रात येणाऱ्या गावांना नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसीकडून पाणी मिळावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. नियोजित नैना क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने सिडकोने कोंढाणा धरणाचा विकास करण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे भविष्यात या कोंढाणा धरणातून नैना क्षेत्र आणि पनवेल महापालिका क्षेत्राच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी) विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली व आदई या ग्रामपंचायतींमधील गावांची पाण्याची सध्याची गरज ओळखून तत्काळ पाणीपुरवठा करावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.