पनवेलकरांना होतोय दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 07:00 AM2018-04-05T07:00:13+5:302018-04-05T07:00:13+5:30

पनवेलमधील ओम सदनिका गृहनिर्माण संस्था या सोसायटीत मंगळवारी सायंकाळी उशिरा अचानकपणे अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी सोसायटीच्या टाकीत येत असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. ७१ सदस्यांच्या सोसायटीला मागील अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे .

 Panvelkar is getting contaminated water supply | पनवेलकरांना होतोय दूषित पाणीपुरवठा

पनवेलकरांना होतोय दूषित पाणीपुरवठा

Next

पनवेल - पनवेलमधील ओम सदनिका गृहनिर्माण संस्था या सोसायटीत मंगळवारी सायंकाळी उशिरा अचानकपणे अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी सोसायटीच्या टाकीत येत असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. ७१ सदस्यांच्या सोसायटीला मागील अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे .
७१ सदस्यांची ही सदनिका सोसायटी असून या सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत दूषित पाणीपुरवठ्यासह मानवी विष्ठा आणि इतर पदार्थ आढळून आले आहेत. त्यामुळे येथील शेकडो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेकडे तक्र ार करून देखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे सोसायटीचे सचिव विनोद नाईक यांनी सांगितले. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे सोसायटीमधील अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून उलटी, जुलाब, खोकल्याचा त्रास अनेकांना होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. पनवेलमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्र ार अनेक रहिवासी करीत आहेत. विशेष म्हणजे आपल्या परिसरात येणारे दूषित पाण्याचे छायाचित्र येथील रहिवासी सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत. यासंदर्भात पाणीपुरवठा अधिकारी डी.आर. अलगट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद देखील दिला नाही. पनवेल शहरात गुलमर्ग, गुलमोहर तसेच पंचमुखी आदी सोसायटीत देखील दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्र ार येथील रहिवासी करीत आहेत. जीर्ण झालेल्या जलवाहिन्या असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास येत आहे. या जलवाहिन्यांची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्रशासनाने तत्काळ हाती घेणे गरजेचे आहे.

आम्हाला मागील चार ते पाच दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनामार्फत अद्याप आम्हाला कोणतीच मदत मिळाली नाही .
- विनोद नाईक,
सचिव, ओम सदनिका गृहनिर्माण संस्था

घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात पालिकेने त्वरित उपाययोजना राबविण्यास सुरु वात केली आहे. मी स्वत: सोसायटीची पाहणी केली आहे. या सोसायटीला त्वरित पाण्याचे नवीन कनेक्शन दिले जाईल.
- डॉ. सुधाकर शिंदे,
आयुक्त, पनवेल महानगर पालिका

पनवेल शहरात काविळीचे ११ रु ग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांना पाणी उकळून पिण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. पनवेल महापालिकेचे आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत, ग्रामीण रु ग्णालयाचे अधीक्षक बसवराज लोहारे, पालिकेचे सहआयुक्त भगवान खाडे यांनी स्वत: शहरात फिरून पाहणी केली.

पनवेलला पाणीबाणीपासून वाचवा : शिवदास कांबळे

पनवेलमध्ये पाणी परिषद भरवून मनपा प्रशासनाने पाण्याचे नियोजन न केल्यास दोन महिने दुष्काळ आणि दोन महिन्यांनंतर पूर येईल अशी स्थिती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी व्यक्त केले आहे. सत्ताधारी पक्षाला पावसाळ्यापूर्वीच्या कामात रस नसून पनवेलमध्ये दोन महिने पाणीबाणी जाणवेल त्यापासून प्रशासनाने पनवेलला वाचवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पाणी म्हणजे जीवन. पनवेल महापालिकेच्या मालकीचे देहरंग धरण असूनही पनवेलकरांच्या घशाला एप्रिल, मे महिन्यात कोरड पडत असते. सातत्याने नियोजनाचा अभाव आणि राजकीय इच्छाशक्तीची कमतरता जाणवते.
पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी नेमक्या याच अनागोंदीवर भाष्य केले आहे. नुकतीच पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पाणीप्रश्नी माजी मंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली.
नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेला मदत करण्यास उत्सुक असल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनाने पाणी परिषद भरवून पाणीबाणीपासून पनवेलला वाचवावे, अशी प्रतिक्रि या त्यांनी दिली आहे.

Web Title:  Panvelkar is getting contaminated water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.