शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

सार्वजनिक दुर्गंधीमुळे पनवेलकर हैराण

By admin | Published: March 21, 2016 2:05 AM

स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या पनवेलकरांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. सिडको नोडसह नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुरेशी सार्वजनिक शौचालयेच नाहीत

नामदेव मोरे, नवी मुंबईस्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या पनवेलकरांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. सिडको नोडसह नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुरेशी सार्वजनिक शौचालयेच नाहीत. ६८ टक्के घरांमध्येच पाइप किंवा सेप्टिक टँकची सुविधा असून, ६४ टक्के परिसर अद्याप मलनिस्सारण केंद्रांशी जोडलेला नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच नदी व खाडीमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सिडकोने दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली. परंतु ज्या परिसराचा उल्लेख केला तो सर्व पनवेल तालुक्याचा भाग आहे. वास्तविक या परिसरातील नागरी समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. सिडकोने खारघर, कामोठे, तळोजा, कळंबोली, नवीन पनवेल हा परिसर विकसित केला आहे. परंतु या परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे या परिसरात मंडई, खरेदी व इतर रहदारीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना शौचालय नसल्याने उघड्यावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. पनवेल शहरामध्येही सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे. पनवेल तालुक्यामध्ये एकूण १ लाख ६७ हजार सदनीकाधारक आहेत. यामधील फक्त ६४ टक्के घरांमध्येच शौचालयांची व मलनिस्सारण वाहिन्यांची सुविधा आहे. यामध्येही २४ टक्के ठिकाणी सेप्टिक टँकचा वापर केला जात आहे. शौचालय नसणारांची संख्या २५ टक्के नागरिकांसाठी शौचालयच नाही. सिडको कार्यक्षेत्रामध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. परंतु याच परिसरातील मूळ गावठाणांमध्ये मात्र अद्याप मलनिस्सारण वाहिन्या टाकलेल्या नाहीत. यामुळे सुनियोजित शहरामध्ये असूनही प्रकल्पग्रस्तांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पनवेल नगरपालिकेने शहरात मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. बंदर रोडवर १४ एमएलडीचे मलनिस्सारण केंद्रही उभारले आहे. परंतु अद्याप शहरातील सर्व इमारती व घरे मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडण्यात आलेली नाहीत. आतापर्यंत जवळपास ५० टक्के जोडण्याच पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित ठिकाणचे सांडपाणी प्रक्रिया न करताच गाढी नदीमध्ये व खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. शहरामध्ये पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटार व्यवस्था तयार केली आहे, परंतु या नाल्यामध्ये बाराही महिने पाणी सोडले जाते. नगरपालिकेने नालेही मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडले आहेत. यामुळे नाल्यांमधील साठलेले पाणी बाहेर काढणे शक्य झाले आहे. सिडको नोड विकसित करताना मूळ गावेही याच परिसरात असून, तेथील इमारतींनाही मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडणे आवश्यक असल्याची गरज ओळखून कामे करणे आवश्यक आहे अन्यथा शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकेल. > महापालिका झाली तरच प्रश्न सुटणार1पनवेल तालुक्याचे पूर्णपणे शहरीकरण झाले आहे. या ठिकाणी शहर व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेसारखी यंत्रणा नाही. यामुळे गावांमध्ये ग्रामपंचायत, विकसित नोडमध्ये सिडको व पनवेल, नवीन पनवेलमध्ये नगरपालिकेकडे व्यवस्थापन आहे. तीन यंत्रणांमध्ये विभागल्यामुळे शहरामध्ये मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे विनण्यात अपयश आले आहे. 2देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याची घोषणा केलेल्या या परिसरात फक्त ६४ टक्के ठिकाणीच मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे असणे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे मानले जात आहे. > मूळ गावठाणांसाठी सुविधा नाहीसिडकोने विकसित केलेल्या नोडमध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. परंतु या परिसरातील मूळ गावठाण व परिसरातील इमारती अद्याप मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडलेल्या नाहीत. गावांमधील जबाबदारी ग्रामपंचायतीवर ढकलली जात आहे. यामुळे अनेक गावांमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाणी रोडवर येण्याच्या घटना घडतात. परिसरात दुर्गंधी पसरून डेंग्यू, मलेरियाची साथही पसरत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे शहर वसले त्याच प्रकल्पग्रस्तांना सुविधा दिल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होऊ लागली आहे. > पर्यावरणाचे नुकसान : पनवेल परिसरामधील फक्त ६४ टक्के इमारती व सदनिका मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडण्यात आल्या आहेत. उर्वरित ठिकाणी अद्याप वाहिन्या टाकलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत तेथेही पूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाणी खाडी व नदीमध्ये सोडले जात आहे. एकेकाळी पनवेलकरांना पाणी पुरविणाऱ्या गाढी नदीचा वापरही सांडपाणी सोडण्यासाठी केला जात आहे. > तालुक्यातील यंत्रणेचा तपशीलपनवेल तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण १ लाख ६७ हजार घरे आहेत. यामधील ७४ हजार घरांमध्ये पाईप सिवर सिस्टीम आहे. ४०२१२ ठिकाणी सेप्टीक टँकचा वापर केला आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी ६४ टक्के बंदीस्त वाहिन्या आहेत. अद्याप १६ टक्के उघड्या गटारांमध्ये सांडपाणी सोडले जात आहे. तालुक्यामध्ये तब्बल ३२१५८ घरांना मलनिस:रण केंद्राशी जोडलेले नाही.> नवी मुंबई पॅटर्न राबवावानवी मुंबईमध्ये महानगरपालिका शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करीत आहे. यासाठी एकूण ४३४ एमएलडी क्षमता असणारी सात मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारले आहेत. शहरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी ५५० किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकल्या आहेत. शहरातील मूळ गावठाणांमधील घरांनाही मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडले आहे. पूर्ण शहराचे व्यवस्थापन महानगरपालिकेकडे असल्याने हे शक्य झाले आहे. पनवेल तालुक्यामध्ये तीन यंत्रणा असल्याने तेथील व्यवस्था कोलमडली आहे. >पनवेलमधील मलनिस्सारण यंत्रणेची वस्तुस्थितीमार्केट, बसस्थानक व इतर ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा अभाव तालुक्यामध्ये ६४ टक्के इमारतींमध्येच मलनिस्सारणाची योग्य व्यवस्था शहर व ग्रामीण भागात २४ टक्के शौचालयांसाठी सेप्टिक टँकचाच वापर२५ टक्के घरांमध्ये स्वतंत्र शौचालय नाहीपनवेल शहरातील ५०% इमारती मलनिस्सारण वाहिन्यांशी जोडलेल्या नाहीतसांडपाणी पावसाळी गटारामध्ये सोडण्याचे प्रमाण जास्त सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी व खाडीत सोडले जातेपनवेल शहरातील मलनिस्सारण केंद्राचा पूर्ण क्षमतेने वापरच नाही