नवी मुंबईसह पनवेलकर असह्य उकाड्याने झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:59 AM2018-04-24T00:59:29+5:302018-04-24T00:59:29+5:30

किमान तापमानातही वाढ : उष्माघाताच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ

Panvelkar with Navi Mumbai is suffering from unbearable cockroaches | नवी मुंबईसह पनवेलकर असह्य उकाड्याने झाले त्रस्त

नवी मुंबईसह पनवेलकर असह्य उकाड्याने झाले त्रस्त

googlenewsNext

नवी मुंबई : गेल्या आठवडाभरापासून काही अंशांनी घटलेले तापमान पुन्हा वाढले असून, नवी मुंबईकर या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. शहरातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील तापमान ३८ अंशांवर गेले असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून, हे तापमान ३९ अंशांवर पोहोचले आहे.
नवी मुंबईतील आर्द्रता ४४ टक्के नोंदविण्यात आली आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच उन्हाची तीव्रता नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असून, ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त त्रास जाणवत असून, उन्हामुळे उष्माघाताचे रु ग्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात वाढत असल्याचे सर्वेक्षण वाशीतील रुग्णालयाच्या वतीने नोंदविण्यात आले आहे. वाढलेल्या उष्मामुळे नागरिक हैराण झाले असून डोळे जळजळणे, अंगदुखी, डोकेदुखी, भूक मंदावणे आदी तक्रारींनी डोके वर काढले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी खाण्या-पिण्याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतिगृह, शीतपेयांकडे वळू लागली आहेत. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणीही प्रचंड वाढली आहे. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. तापमान ४०च्या पुढे गेल्यास लोकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणे, सावलीत राहणे, सुती आणि सैल कपडे घालणे, कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे न करणे, अशा सोप्या गोष्टींनी उष्माघाताचा धोका टाळता येतो. चक्कर यायला लागली असेल तर तुम्हाला उष्माघाताचा त्रास सुरू आहे, असे जाणून वेळेत वरील सोपे उपाय करणे पुढील मोठ्या धोक्यापासून वाचवू शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

उष्माघातावर उपचार
आपल्या आजूबाजूला कोणाला उष्माघाताचा झटका आला वा त्रास होऊ लागला, तर त्वरित दवाखान्यात न्यावे.

सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते.

शरीराला ओल्या कपड्याने पुसून काढावे आणि व्यक्तीच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी.

बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक द्यायला सुरु वात करावी. कारण वरील जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडतेमुळे शरीराचे उष्ण तापमान कमी व्हायला मदत होते.
व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा किंवा त्या व्यक्तीला बाथटबमध्ये बुडवावे वा बर्फ टाकावा.
व्यक्तीला मूर्च्छा आली असेल तर श्वसनक्रि येची तपासणी करावी.
व्यक्ती शुद्धीवर आल्यावर त्याला पाणी पिण्यास द्यावे.

ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्माघाताची लागण
उष्माघात हा प्रामुख्याने वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाºया लोकांमध्ये आढळतो. अर्भके व चार वर्षांपर्यंतची लहान मुले, पासष्टीच्या पुढील वृद्ध मंडळी यांना उष्माघाताचा त्रास अधिक सहजपणे होऊ शकतो, असे डॉ. मेहुल कालवाडीया यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांत आमच्याकडे येणाºया रु ग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमाणात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानांमुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आहे, त्यांना उष्माघाताची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही कालवाडीया यांनी स्पष्ट केले.

Web Title: Panvelkar with Navi Mumbai is suffering from unbearable cockroaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.