एनएमएमटीच्या बसेसवर पनवेलकरांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:32 AM2017-08-11T06:32:07+5:302017-08-11T06:32:07+5:30

निवडणुकीअगोदर पनवेलकरांना स्वतंत्र परिवहन सेवेची प्रलोभने देणाºया सत्ताधाºयांना आता त्याचा विसर पडला आहे. प्रशासनानेही तूर्तास स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

Panvelkar's Mudar on NMMT buses | एनएमएमटीच्या बसेसवर पनवेलकरांची मदार

एनएमएमटीच्या बसेसवर पनवेलकरांची मदार

Next

- कमलाकर कांबळे 
नवी मुंबई : निवडणुकीअगोदर पनवेलकरांना स्वतंत्र परिवहन सेवेची प्रलोभने देणाºया सत्ताधाºयांना आता त्याचा विसर पडला आहे. प्रशासनानेही तूर्तास स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे पनवेलकरांना पुढील काही वर्षे एनएमएमटी आणि इतर शहराच्या परिवहन सेवेच्या बसेसवर विसंबून राहावे लागणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा नैना प्रकल्प, मेट्रो आदीमुळे पनवेल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात या क्षेत्रात विकासाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्यामुळे बड्या गुंतवणूकदारांनी आपले लक्ष पनवेल परिसरावर केंद्रित केले आहे. त्यामुळे या परिसरात नवनवीन गृहप्रकल्पांचे पेव फुटले आहे. या क्षेत्रात सर्वसामान्यांच्या बजेटमधील घरे तयार होत असल्याने चाकरमान्यांचा ओढा आता पनवेलकडे वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणून पनवेल शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडू लागला आहे. विशेषत: परिवहनसारख्या सेवेची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर २0१५ मध्ये नगर परिषदेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली होती. निधीसाठी जेएनएनयूआरएमकडे प्रस्तावही पाठविण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर वाहननिर्मिती कंपनीला १00 बसेसची आॅर्डरही देऊन टाकली होती. परंतु याच काळात केंद्राने जेएनएनयूआरएम ही योजना बंद केल्याने परिवहन सेवा सुरू करण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांना खीळ बसली होती. परंतु याच दरम्यान म्हणजेच आॅक्टोबर २0१६ मध्ये पनवेल महापालिकेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे स्वतंत्र परिवहन सेवेच्या विषयाला काहीशी बगल मिळाली. असे असले तरी अलीकडेच झालेल्या महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात परिवहन सेवेला आग्रस्थान दिले होते. त्यामुळे याबाबत पनवेलकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु सध्याच्या स्थितीत परिवहन सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने पनवेलकरांची पुन्हा निराशा झाली आहे.

पनवेल क्षेत्रात सध्या एनएमएमटीच्या बसेस धावतात. एनएमएमटीच्या आसुडगाव येथील डेपोमधून पनवेल परिसरात १५ मार्गांवर बसेस धावतात. तर दोन दिवसांपूर्वी आणखी दोन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तथापि आणखी सहा मार्ग सुरू करण्याची पनवेल महापालिकेची मागणी आहे. परंतु एनएमएमटीकडे पुरेशा बसेस नसल्यामुळे आणखी मार्ग सुरू करणे शक्य नसल्याचे एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी स्पष्ट केले आहे.

वचननामा कागदावरच
मागील दहा वर्षांत पनवेलमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीच्या वचननाम्यात परिवहन सेवेचा मुद्दा प्रमुख राहिला आहे.\

राज्यात सुरू असलेल्या विविध परिवहन सेवांची अवस्था ठीक नाही. त्यामुळे राज्य सरकारने आहे त्याच परिस्थितीत जुळवून घेण्याचे निर्देश महापालिका व नगरपालिकांना दिले आहेत. असे असले तरी एमएमआरडीएमार्फत यासंदर्भात वेगळ्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भातील संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य होईल.
- डॉ. सुधाकर शिंदे,
आयुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Panvelkar's Mudar on NMMT buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.