शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

पनवेलचा ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 7:04 AM

पनवेल महापालिकेचा २०१८ - १९ आर्थिक वर्षासाठी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, आरोग्य, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केली आहे. मनपाचे उत्पन्न वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पनवेल - पनवेल महापालिकेचा २०१८ - १९ आर्थिक वर्षासाठी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, आरोग्य, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केली आहे. मनपाचे उत्पन्न वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे पनवेलवासीयांचे लक्ष लागले होते. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी ७४ कोटी रुपये शिल्लक असलेला ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. स्मार्ट, स्वच्छ सुंदर पनवेलचा संकल्प घेवून काम करणाºया शिंदे यांनी अर्थसंकल्पामध्येही शहराच्या सर्वांगीण विकासाचा समावेश केला आहे. २०१७ - १८ चा अर्थसंकल्प १२०० कोटींवरून ४३७ कोटी करण्यात आला असून सुधारित अर्थसंकल्पही स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला.महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कराच्या माध्यमातून १०० कोटी, एलबीटीच्या माध्यमातून ९० कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. पालिकेने उत्पन्नासाठी तब्बल १२५ हेड तयार केले आहेत. उत्पन्नाचे मार्ग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. मालमत्ता कर हा उत्पन्नाचा स्रोत असणार आहे. पालिका मालमत्ता कराचे नवीन दर निश्चित करणार असून त्यानंतर उत्पन्नाचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. पालिकेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होणार आहे.आयुक्तांनी अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मांडला. अर्थसंकल्प वास्तववादी असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. पायाभूत सुविधा विकसित करणे, रस्ते, गटार, पाणी, मलनि:सारण, उद्यान, पथदिवे व इतर सर्व सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पनवेलकरांनी कर रूपाने दिलेल्या पैशाचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी अर्थसंकल्पावर पुढील आठवड्यात चर्चा करून त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले.पनवेलचा सर्वांगीण विकास करणारा वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर देण्यात येणार असून कर रूपाने नागरिकांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर केला जाईल.- डॉ. सुधाकर शिंदे,आयुक्तअर्थसंकल्पाच्या अखेरच्या शिलकीवर आम्ही समाधानी नाही. कामे होत नसल्याने मागील शिल्लक राहिली आहे. पुढील एक आठवडा सदस्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात आला असून त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा होईल.- अमर पाटील,सभापती, स्थायी समितीमागील अर्थसंकल्प ४३८ कोटींचा होता. अर्थसंकल्पात केवळ १८ टक्के खर्च झाला नव्हता. नवीन बजेटमधील रक्कम जास्तीत जास्त विकासकामासाठी वापरली जावी.- परेश ठाकूर,सभागृह नेते, महापालिकाआयुक्तांनी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. पुढील सात दिवसांमध्ये अर्थसंकल्पावर अभ्यास करून शहर विकासाच्या योजनांचा समावेश करण्याच्या सूचना केल्या जातील.- प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेतेलेखाशीर्ष उत्पन्नआरंभीची शिल्लक ७४मालमत्ता कर १००एलबीटी ९०महसुली अनुदान ७२भांडवली अनुदान ५९पाणीपट्टी २५एकूण ५१६लेखाशीर्ष खर्चआस्थापना खर्च ७४बांधकाम १२५अनुदानातून कामे ५३शहर सफाई, महसुली ३६विद्युत व उद्यान ३०पाणीपुरवठा २८प्रभाग समिती १४इतर खर्च १२५अखेरची शिल्लक ३१एकूण ५१६शहर स्वच्छतेसाठी ३६ कोटीअर्थसंकल्पामध्ये शहर स्वच्छतेसाठी तब्बल ३६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कचरा हाताळणी, कचरा हाताळणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे, स्वच्छ भारत अभियान राबविणे, साथीचे आजार पसरू नये यासाठी जनजागृती करण्यासाठीही अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. कर्मचाºयांसाठी गमबूट व हँडग्लोज खरेदी करण्यात येणार आहे.श्वान नियंत्रण कार्यक्रमअर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागासाठीही तरतूद केली आहे. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. उंदरांचा सुळसुळाटही वाढला आहे. यामुळे श्वान नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी १० लाख व मूषक नियंत्रणासाठी तब्बल २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. साथीचे आजार पसरू नयेत यासाठीची जनजागृती करण्यासाठी एक कोटीची तरतूद केली आहे.

टॅग्स :panvelपनवेलBudgetअर्थसंकल्प