पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत असलेल्या भूखंड क्रमांक २७० वर महाराष्टÑ राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड या कंपनीकडून उभारण्यात आलेले सबस्टेशन वादाच्या भोवºयात सापडले आहे. १९६४ मध्ये संपादित केलेल्या जागेची विभागणी न करता या ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारण्यात आल्याची तक्रार पनवेलमधील मुल्ला कुटुंबीयांनी केली आहे. या भूखंडाची विभागणी करण्यासाठी मुल्ला कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.
१९६४ मध्ये महावितरणसाठी सईद मुल्ला यांच्या सामाईक मालकीची ५० गुंठे जमीन संपादित करण्यात आली. भूखंडापैकी २५ गुंठे जागा मुल्ला कुटुंबीयांची असून, उर्वरित २५ गुंठे जागा सबस्टेशनच्या नावे घेण्यात आली आहे. या जागेचा मोबदलाही मुल्ला कुटुंबीयांनी घेतला आहे. मात्र, संपादित केलेल्या जागेची विभागणी न करता महावितरणने या ठिकाणी उपकेंद्र उभारले आहे. उपकेंद्र उभारताना पनवेल पालिकेची परवानगीही घेतली नाही. जागेवर महावितरण व मुल्ला कुटुंबीयांचा समान अधिकार असताना मुल्ला कुटुंबीयांना विश्वासात न घेता महावितरणने सबस्टेशन उभारले.मुल्ला कुटुंबीयांचा सबस्टेशनाला आक्षेप नाही. मात्र, जागेची विभागणी झाली नसताना अशाप्रकारे सबस्टेशन उभारणे कितपत योग्य आहे. याकरिता मुल्ला कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली आहे. टाउन प्लॅनिंग आराखड्यावरही मुल्ला कुटुंबीयांचेच नाव आहे. जागेची विभागणी केली नसताना भूधारकाला विश्वासात न घेता थेट त्याच्यावर बांधकाम करणे चुकीचे असल्याचा आरोप मुल्ला कुटुंबीयांनी केला आहे.महावितरणने बांधलेले सबस्टेशन महाराष्ट्रातील पहिलेच गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आहे. या सबस्टेशनचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. संपादित केलेल्या जागेची विभागणी करून आमची मालकी असलेली जागा महावितरणने परत करावी, अशी मागणी सईद मुल्ला यांनी केली आहे.भूखंड क्रमांक २७० महाराष्टÑ राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या मालकीचा आहे. सर्व परवानग्या घेऊनच उपकेंद्र उभारण्यात आले आहे. पुढील महिन्यात सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.- ममता पांडे,जनसंपर्क अधिकारी, एमएसईबी, भांडूप