पनवेल : पनवेल शहराला भेडसावणाऱ्या पाण्याच्या भीषण समस्येसंदर्भात पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांची भेट घेतली. पनवेलला भेडसावणाºया पाणीप्रश्नाबाबत सकारात्मक विचार करून पनवेल शहराला पाच एमएलडी पाणी द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.पनवेल शहरात दररोज १५ एमएलडी पाण्याचा तुटवडा भासतो. नवी मुंबई महापालिकेने देऊ केलेले दररोज ५० टँकर पाणी घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने दररोज पाच एमएलडी पाणी द्यावे, या मागणीसाठी महापालिकेतील सत्ताधारी प्रयत्न करीत आहेत. पाणीपुरवठा व जलसंपदामंत्र्यांकडे मागणी केल्यानंतर गुरुवारी नवी मुंबईच्या महापौरांना वाढीव पाण्याची मागणी केली. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर, नगरसेवक जगदिश गायकवाड, अभिमन्यू पाटील, अमर पाटील, नितीन पाटील यांनी महापौर जयवंत सुतार यांना निवेदन दिले.देहरंग धरणातील मातीवरील रॉयल्टी माफदेहरंग धरणातील माती काढण्यासाठी रॉयल्टीमध्ये सूट देण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र लिहिले होते. जिल्हाधिकाºयांनीही गाळ काढण्याकरिता रॉयल्टी माफ केल्याची माहिती महापौर चौतमोल यांनी दिली आहे. या निर्णयामुळे लवकरच धरणातील गाळ काढण्याच्या प्रक्रि येला सुरु वात होणार आहे.नवी मुंबई महापालिकेने थेट जलवाहिनीच्या माध्यमातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केल्यास शहरातील पाणीप्रश्न नक्कीच सुटेल. पाच एमएलडी पाणी आम्हाला देण्याची मागणी नवी मुंबई महापालिकेच्या महापौरांकडे केली आहे.- डॉ. कविता चौतमोल,महापौर, पनवेल
पनवेलचा पाणीप्रश्न पुन्हा नवी मुंबई दरबारी, पाच एमएलडी पाण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:09 AM