पनवेल : पोलीस रेकॉर्डमध्ये असलेल्या गुन्हेगारांची माहिती तसेच आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी राज्य गृह विभागाने तयार केलेल्या सीसीटीएनएस (क्र ाइम अॅन्ड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्किंग अॅन्ड सिस्टीम)ला नवी मुंबईतील पोलीस ठाण्यांत सुरु करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असेलली ही कार्यप्रणाली आता पूर्णत्वास आली आहे. सीसीटीएनएससाठी लागणारे संगणक संच, त्यासाठी लागणारे सर्व्हर या सर्व बाबी पोलीस ठाण्यांमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यासाठी जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांना या यंत्रणेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दररोज दाखल होणारे गुन्हे, त्यांची माहिती आॅनलाइन भरण्यात येत आहे. त्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवावी लागणारी माहिती एकाच क्लिकवर सर्वत्र पोहोचते. सध्या हा सर्व डेटा राज्याच्या सर्व्हरला कनेक्ट आहे. तो नॅशनल सर्व्हरला लवकरच कनेक्ट होणार आहे.
नवी मुंबई पोलिसांचा पेपरलेस कारभार
By admin | Published: August 23, 2015 3:48 AM