शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

हक्कासाठी प्रकल्पग्रस्त महिला एकवटल्या

By admin | Published: February 22, 2017 7:00 AM

प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपोषण व धरणे आंदोलन

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आगरी कोळी युथ फाऊंडेशनने घेतला आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये बैठकांचे आयोजन सुरू झाले आहे. चळवळीमध्ये महिलांचाही सहभाग वाढत आहे. प्रत्येक गावामध्ये महिलांची कमिटी तयार करण्यात आली असून जनजागृतीसाठी बैठका सुरू झाल्या आहेत. सिडको, महापालिका व शासनाकडून साडेचार दशक सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्त तरुणांनी आंदोलन छेडले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यात यावीत. सिडको व महापालिकेकडून सुरू असलेली अन्यायकारक कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी. रोजगारासह सर्व प्रश्न सोडविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेपर्यंत सीबीडीमध्ये उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांनी सहभागी व्हावे यासाठी प्रत्येक गावामध्ये बैठका घेऊन जनजागृती सुरू झाली आहे. या वेळी या बैठकांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. प्रत्येक गावामध्ये कमिटी तयार केली जात आहे. बैठका घेऊन या लढ्यामध्ये जास्तीत जास्त योगदान कसे द्यायचे याविषयी चर्चा केली जात आहे. आंदोलनादरम्यान महिलांवरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांनी कोणतीही चळवळ महिलांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले होते. प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यांच्या यशामध्ये महिलांचेही मोठे योगदान आहे. यामुळे आगरी कोळी युथ फाऊंडेशननेही समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या महिलांना चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)सक्रिय महिलांचा तपशीलनावगावरेश्मा पाटीलगोठीवलीमनीषा पाटील गोठीवलीकोमल पाटील राबाडाअमृता मढवीदिवा विद्या पाटीलदिवा शुभांगी ठाकूरनेरूळकल्पना पाटीलनेरूळकुमुद भोपीनेरूळनैना पाटीलनेरूळमाधुरी पाटीलऐरोली