पनवेल : शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. फीवाढीचा निषेध करून उपमुख्याध्यापिका मोनाक्षी गुप्ता यांना घेराव घातला.शांतीनिकेतन शाळेत विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी घेतली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच लायब्ररी, इव्हेंट, अॅक्टिव्हिटीच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच शाळेचे कपडे व पुस्तके कामोठे व खारघर येथील दुकानातूनच घ्यावे यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी कमी किमतीत मिळणारी पुस्तके व कपडे शाळा प्रशासनाकडून नाकारली जात असल्याचे श्याम हंबर्डे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी तक्र ार दाखल केली आहे. मात्र तरी देखील शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी शिक्षणमंत्र्यांसह जिल्हाधिकारी अलिबाग आणि पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पत्रव्यवहार केला आहे. शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाने २१ फेब्रुवारी २0१८ रोजी एन.सी.इ.आर.टी. कडून प्रकाशित झालेली अभ्यासक्र माची पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरण्याबाबत बंधनकारक करून खासगी प्रकाशनाची पुस्तके देण्यात येऊ नयेत, असे कळविले आहे. शाळेमधील पात्र मुख्याध्यापक आणि पात्र शिक्षक यांची नियुक्ती ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करण्यात येऊ नये याबाबत सांगण्यात आले आहे. आणि याबाबतची प्रत मा.शिक्षण संचालक (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनाही पाठविण्यात आल्याचे पत्र पालकांकडून सादर करण्यात आले असले तरी शांतीनिकेतन शाळेतील शिक्षकांची नियुक्ती चुकीची असल्याचाही आरोप यावेळी पालकांमार्फत करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापनाच्या जागेत भाड्याने देण्यात आलेल्या अपना बँकेबाबत पालकांनी आवाज उठविताना सांगितले की, शाळा प्रशासन विद्यार्थ्यांची योग्य काळजी न घेता आणि शाळा दुरु स्तीच्या नावाखाली पैसे मागत असते.गतवर्षी पालकांची सभा घेऊन ३५ लाख रु पये शाळेला गरज असल्याचे सांगून पालकांवर भर देण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाने केल्यामुळे संतप्त पालकांनी मात्र याबाबत व्यवस्थापनाकडे गेल्या काही वर्षातील हिशोब मागितला असता शाळा व्यवस्थापनाला आर्थिक गळती लागल्याचे समोर आले. त्यामुळे पालकांना अखेर आपल्या पाल्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्या शिक्षणासाठी कठोर पावले उचलावी लागली आहेत.याविषयी व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.>खिडक्यांना ग्रील बसवावेशांतीनिकेतन शाळेच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील लावलेले नाहीत. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कळंबोली येथील सेक्टर ४ मधील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये विघ्नेश सतीश साळुंखे ( १२) या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून जुलै २0१५ मध्ये उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दुर्घटना होण्यापूर्वीच ग्रील बसविण्यात यावेत अशी सूचना पालकांनी केली आहे.
पालकांचे शांतीनिकेतन शाळेविरोधात आंदोलन, फीवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:44 AM