पनवेल : नवीन पनवेलमधील पार्किंगचा प्रश्न न सोडवल्यास काही दिवसांनी नागरिकांना चालणे शक्य होणार नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची मागणी येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे. पनवेल महापालिका झाल्यावर पहिले आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पनवेल शहरात अनेक सुधारणा घडवून आणल्या. पनवेलमधील अनधिकृत बांधकाम, हातगाड्या व फेरीवाल्यांना हटवून रस्ते, पदपथ मोकळे करण्यात आले होते. मात्र त्यांची बदली होताच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर १५ मध्ये रस्त्यावर अनेक हातगाड्या उभ्या दिसतात. त्यातच महावितरणची केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे शक्य होत नाही. महिला व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. सेक्टर १५ ए मध्ये डीएचएफएलच्या कार्यालयासमोर फुटपाथवरच चारचाकी वाहने उभी करण्यात येत आहेत. रस्त्यावरून चालायला जागा नाही, त्यातच फुटपाथवर गाड्या उभ्या केल्याने चालायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी मनोज भुजबळ यांच्याकडे संपर्क केला असता, त्यांनी निवडणुकीनंतर प्राधान्याने हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रस्त्यावर खोदलेले खड्डे बुजविण्यासाठी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना उत्कर्ष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फेनिवेदन देण्यात आले असून त्यांनी काम सुरू करण्याचे ठेकेदाराला आदेश दिल्याची माहिती दिली. (वार्ताहर) सिडकोकडे रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ८४ लाख रु पये भरले आहेत. आमचे काम पूर्ण झाले असून आता सिडकोने ते खड्डे बुजवून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम करावयाचे आहे.- जे.एस. बोडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण
नवीन पनवेलमधील पार्किं गचा प्रश्न गंभीर
By admin | Published: May 05, 2017 6:18 AM