पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By admin | Published: July 9, 2015 12:56 AM2015-07-09T00:56:26+5:302015-07-09T00:56:26+5:30
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पार्किंगअभावी जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनू लागली आहे.
नवी मुंबई : शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पार्किंगअभावी जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनू लागली आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांची भेट घेतली.
शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बेकायदा गॅरेजेस आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. कोपरखैरणे, वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे या परिसरात तर हा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नाईक यांनी यावेळी केली. तसेच आवश्यक तेथे सम - विषय पार्किंग सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. उड्डाणपुलाखालील धोकादायक पार्किंगचा प्रश्न नेहमीच चर्चिला जात आहे. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी आज शहरातील अनेक उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंग सुरूच असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)