शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाढले पार्किंगचे दर; दर्शकांच्या खिशाला कात्री, ‘कोल्ड पे’ आयोजकांची कोटींची उड्डाणे

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 18, 2025 09:39 IST

मुंबई, नवी मुंबईसह लगतचे प्रेक्षक वगळता इतरांकडून भाड्याच्या कार, टॅक्सीचा वापर होणार आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची पार्किंगमधून लूट करण्याची नियोजनबद्ध रचना करून खासगी वाहनाने येणाऱ्यांसाठी ७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यात स्टेडियम लगतची तीन ठिकाणे सशुल्क असणार आहेत. त्यांचे दर हे तासनिहाय बदलत असल्याने पार्किंगच्या माध्यमातूनही दर्शकांना खिशाला मोठी कात्री बसणार आहे.यातून आयोजकांनी पार्किंगमधून कोटींची उड्डाणे घेतली आहेत.

मुंबई, नवी मुंबईसह लगतचे प्रेक्षक वगळता इतरांकडून भाड्याच्या कार, टॅक्सीचा वापर होणार आहे. परंतु, तिकीट विक्रीवरून १० ते १२ टक्के प्रेक्षक मुंबई व लगतचे आहेत. त्यापैकी अडीच ते तीन हजार प्रेक्षक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, उद्योजक खासगी वाहनाने येण्याची अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी खारघर, नेरूळ, सीबीडी येथे ७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. तीन वाहनतळे सशुल्क आहेत. स्टेडियम जवळच्या  तीन वाहनतळ वापरण्यासाठी ऑनलाइन आगाऊ बुकिंग ठेवली आहे.

खासगी बस, कारचा आधारमोबाइल ॲपद्वारे चालणाऱ्या खासगी बस, टॅक्सी यांचीही कोल्ड प्ले आयोजकांनी जुळवणी केली आहे. कार्यक्रमासाठी येणारी भाडी त्यांच्यामार्फत हाताळली जाणार असून, त्यांना तिकिटानुसार कोणत्या गेटवर सोडायचे याची कल्पनाही व्यावसायिक बस, कारचालकांना देण्यात आली आहे.

स्टेडियमभोवती १७ क्रेनची व्यवस्था स्टेडियमकडे येणाऱ्या मार्गावर, तसेच परिसरातील रस्त्यावर एखादे वाहन बंद पडल्यास, पार्किंग केल्यास वाहतूककोंडी होऊ शकते. हे टाळण्यासाठी स्टेडियमभोवती  १७ क्रेनची व्यवस्था केली आहे.

गोरेगाव ते नेरूळ लोकलकोल्ड प्ले काळात गोरेगाव ते नेरूळ या मार्गावर विशेष लोकल चालवली जाणार आहे. १८ व १९ तारखेला दुपारी २ वाजता गोरेगाव येथून ट्रेन सुटणार आहे. रात्री ११ वाजता नेरूळमधून ती  गोरेगावला जाणार आहे. २१ तारखेला गोरेगाव येथून दुपारी २ व ३ वाजता दोन ट्रेन धावणार असून, रात्री १०:४५ व ११ वाजता नेरूळ ते गोरेगाव अशी ट्रेन धावणार आहे. 

तीन दिवसांत दीड कोटींची उलाढालतिन्ही ठिकाणी सुमारे अडीच हजार वाहने पार्किंग होऊ शकतात. त्यामुळे आपापल्या वाहनांची पार्किंग निश्चित करण्याची स्पर्धा लावून आगाऊ बुकिंगच्या माध्यमातून हात धुवून घेतला जात आहे. दुपारी ४९९ रुपयांवर असलेले शुल्क संध्याकाळी ६९९ रुपये झाले होते. तर, रात्री ते १,२९९ रुपये इतके केले. यामुळे तीन दिवसांत केवळ वाहनतळाच्या माध्यमातूनच सव्वा ते दीड कोटी रुपये आयोजकांच्या खिशात जाणार असल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई