मंगळवारी अडीच तास मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या वेळांत अंशत: बदल

By कमलाकर कांबळे | Published: April 20, 2024 08:54 PM2024-04-20T20:54:00+5:302024-04-20T20:54:44+5:30

...त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार या विभागातून धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहेत.

Partial change in timings of Megablock, Konkan Railway for 2.5 hours on Tuesday | मंगळवारी अडीच तास मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या वेळांत अंशत: बदल

प्रतिकात्मक फोटो...

नवी मुंबई : करंजाडी - चिपळूणदरम्यान मालमत्तेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेने २३ एप्रिल रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. दुपारी १:१० ते दुपारी ३:४० या दरम्यान हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार या विभागातून धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहेत.

कोकण रेल्वेने मान्सूनपूर्व कामांना गती दिली आहे. त्यानुसार आवश्यक त्या मार्गावर मेगाब्लॉक घेऊन दुरुस्तीची कामे केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार २३ एप्रिल रोजी करंजाडी-चिपळूणदरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कोईम्बतूर - जबलपूर (०२१९७) या विशेष गाडीचा २२ एप्रिलचा प्रवास रत्नागिरी - कामठे स्थानकादरम्यान ७० मिनिटांसाठी रोखून धरला जाणार आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड- दिवा एक्स्प्रेस (१०१०६) या गाडीचा २३ एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड-रत्नागिरी स्टेशनदरम्यान १ तास ४० मिनिटांसाठी स्थगित केला जाणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरूअनंतपूरम सेंट्रल (१६३४५) एक्स्प्रेसचा २३ एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास कोलाड - वीर स्टेशन दरम्यान ५० मिनिटांसाठी स्थगित केला जाईल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Partial change in timings of Megablock, Konkan Railway for 2.5 hours on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.