शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

उरणमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:21 AM

उरण परिसरातील जेएनपीटी बंदराच्या आणि गोदामांच्या उभारणीनंतर उरलेल्या विविध खाड्या, जलाशये आणि पाणथळ जागांवर फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उरण परिसरातील जेएनपीटी बंदराच्या आणि गोदामांच्या उभारणीनंतर उरलेल्या विविध खाड्या, जलाशये आणि पाणथळ जागांवर फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत. स्वैर विहार करीत विविध जलाशयात बागडणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आकर्षक छबी टिपण्यासाठी आणि विलोभनीय फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची सध्या गर्दी वाढू लागली आहे. एरव्ही पावसाळा सुरू होताच माघारी परतणारे फ्लेमिंगो उरण परिसरात यावर्षी वास्तव्य वाढल्याने पक्षिप्रेमी सुखावले आहेत.उरण परिसरात विस्तीर्ण जलाशय, खाड्या आणि पाणथळ जागी स्थलांतरित दुर्मीळ जलचर पक्ष्यांची नेहमीच गर्दी असते. जलाशय, खाड्यात शेवाळ, प्रवाळ, खुबे, छोटे-मोठे मासे, कृमी कीटक, शंख शिपले विपुल प्रमाणात खाद्य मिळत असल्याने विविध जातीचे, विविध रंगांचे आकर्षक लाखोंच्या संख्येने स्थलांतरित आणि जलचर पक्षी थव्याथव्यांनी आणि मोठ्या संख्येनी उरण परिसरात येत असतात. यामध्ये प्रामुख्याने फ्लेमिंगो, पेलिकन, करकोचा, माळढोक आणि इतर अनेक जातींच्या जलचर पक्ष्यांचा समावेश आहे. विस्तीर्ण जलाशये, खाड्या, पाणथळ जागांवर विविध जलचर दुर्मीळ पक्ष्यांची होणारी गर्दी आणि त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पक्षिप्रेमींची उरण परिसरात विविध ठिकाणी रेलचेल असते. डोंगणी-पाणजे खाडीतील फ्लेमिंगोंची गुलाबी छटा टिपण्यासाठी पक्षिप्रेमींची तर चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच जासई-दास्तान फाट्याजवळील जलाशय, जेएनपीटी-जासई रोड दरम्यानच्या पाणथळ जागांवरही फ्लेमिंगोंचे दर्शन होऊ लागले आहे. जेएनपीटी बंदरांतर्गत सध्या चौथ्या अवाढव्य बंदराचे काम वेगाने सुरू आहे. पाणजे-डोंगरी खाडीतच ५०० एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात माती-दगडाच्या भरावाचे काम सुरू आहे. त्यामुळे असे फ्लेमिंगो पाहण्याचा योग भविष्यात पुन्हा मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. फ्लेमिंगो आणि दृष्टीस पडणाऱ्या विविध जलचर पक्ष्यांची विविध ठिकाणची आश्रयस्थाने भरावामुळे बुजवली गेली आहेत. चौथ्या बंदरामुळे डोंगरी-पाणजे खाडीतील फ्लेमिंगोंसाठी उरलेली आश्रयस्थानेही भरावात नष्ट होेत आहेत. त्यामुळे असे फ्लेमिंगो पक्षी पुन्हा पक्षिप्रेमींना पाहण्यास मिळतील की नाही, हे सांगणे कठीण.