स्वबळावर लढण्यास पक्ष उत्सुक

By admin | Published: December 30, 2016 04:22 AM2016-12-30T04:22:43+5:302016-12-30T04:22:43+5:30

पनवेल महापालिकेच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच पक्षीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस

Party keen to fight on your own | स्वबळावर लढण्यास पक्ष उत्सुक

स्वबळावर लढण्यास पक्ष उत्सुक

Next

कळंबोली : पनवेल महापालिकेच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच पक्षीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आयची मदत घेण्याच्या विचारात असला तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे मात्र ‘एकला चलो रे’साठी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे रायगड जिल्ह्यात सातत्याने विरोधात लढले आहेत. वेगवेगळे विचार आणि मतप्रवाह असलेल्या या पक्षांमध्ये फारसे सख्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात लालबावट्याने कित्येक वर्षे अंमल केला. या जिल्ह्यातून अलिबाग, पेण, पनवेल या तीनही विधानसभा मतदारसंघात २००९ पर्यंत सातत्याने शेकापने नेतृत्व केले. या व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे रुजल्याने खटाऱ्याचा राजकीय वेग खूप होता. असे असले तरी निवडणुकीत काँग्रेसने शेकापला शह दिला असून कोणतीही निवडणूक सहज जिंकून दिली नाही. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसने नेहमीच आपला ठसा उमटवला. यामुळे काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक तालुक्यात आहे.
पनवेलचा विचार केला तर २०१४ पर्यंत लाल बावट्याला काँग्रेसने नेहमीच अटीतटीचा शह दिला. मात्र प्रशांत ठाकूर यांनी भाजपाचे कमळ हातात घेतल्यामुळे पनवेलमधील काँग्रेसची ताकद कमी झाली. काँग्रेसचे नेतेही हे मान्य करतात.
अल्पसंख्याक समाज सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. त्यामुळे पनवेलमध्ये काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा विचार प्रवाह वाढत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा सरचिटणीस डॉ. भक्तीकुमार दवे यांनी आमचा पक्ष स्वबळावर लढला तर चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर पनवेल नगरपालिकेवर सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. तसेच सर्वाधिक नगराध्यक्ष या पक्षाचे झाले असल्याने आगामी निवडणुकीत इतर पक्षांशी हातमिळवणी करायची का, याबाबत संभ्रम आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पक्षाची भूमिका लवकरच स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे पदाधिकारी सांगताहेत.

आरक्षणामुळे राजकीय समीकरणे चुकली
पनवेल महापालिकेच्या प्रभाग रचनेची सोडत जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून लोकप्रतिनिधींसमोर ही निवडणूक लढणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल शहर महापालिकेची स्थापना झाली. मात्र त्याधीच कळंबोली, पनवेल, कामोठे, तळोजा, खारघर या ठिकाणी इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी तयारी सुरू केली होती. प्रभाग रचनेचा अंदाज घेऊन अनेक ठिकाणी स्थानिक पक्षांनी कार्यालये सुरू केली आहेत. मंगळवारी आरक्षण जाहीर झाल्यावर अनेकांची राजकीय समीकरणे चुकली तर काही इच्छुकांचा हिरमोड झाल्याने त्यांनी नातेवाइकांच्या वर्णीसाठी तयारी सुरू केली आहे.

जिल्हाध्यक्षपदाकरिता इच्छुकांची यादी
पनवेल महापालिका झाल्याने राजकीयदृष्ट्या पनवेल हा जिल्हा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता स्वतंत्र जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्याकरिता डॉ. भक्तीकुमार दवे, विद्यमान रायगड जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, कामगार नेते श्याम म्हात्रे आदी नेते, पदाधिकारी इच्छुक आहेत. मागील निवडणुक उरण विधानसभा मतदारसंघात लढलेले महेंद्र घरत सुध्दा जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. याशिवाय कांतीलाल कडू यांचे नाव सुध्दा चर्चेत आहे.

Web Title: Party keen to fight on your own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.