शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

स्वबळावर लढण्यास पक्ष उत्सुक

By admin | Published: December 30, 2016 4:22 AM

पनवेल महापालिकेच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच पक्षीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस

कळंबोली : पनवेल महापालिकेच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच पक्षीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आयची मदत घेण्याच्या विचारात असला तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे मात्र ‘एकला चलो रे’साठी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे रायगड जिल्ह्यात सातत्याने विरोधात लढले आहेत. वेगवेगळे विचार आणि मतप्रवाह असलेल्या या पक्षांमध्ये फारसे सख्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात लालबावट्याने कित्येक वर्षे अंमल केला. या जिल्ह्यातून अलिबाग, पेण, पनवेल या तीनही विधानसभा मतदारसंघात २००९ पर्यंत सातत्याने शेकापने नेतृत्व केले. या व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे रुजल्याने खटाऱ्याचा राजकीय वेग खूप होता. असे असले तरी निवडणुकीत काँग्रेसने शेकापला शह दिला असून कोणतीही निवडणूक सहज जिंकून दिली नाही. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसने नेहमीच आपला ठसा उमटवला. यामुळे काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक तालुक्यात आहे. पनवेलचा विचार केला तर २०१४ पर्यंत लाल बावट्याला काँग्रेसने नेहमीच अटीतटीचा शह दिला. मात्र प्रशांत ठाकूर यांनी भाजपाचे कमळ हातात घेतल्यामुळे पनवेलमधील काँग्रेसची ताकद कमी झाली. काँग्रेसचे नेतेही हे मान्य करतात. अल्पसंख्याक समाज सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. त्यामुळे पनवेलमध्ये काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा विचार प्रवाह वाढत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा सरचिटणीस डॉ. भक्तीकुमार दवे यांनी आमचा पक्ष स्वबळावर लढला तर चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर पनवेल नगरपालिकेवर सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. तसेच सर्वाधिक नगराध्यक्ष या पक्षाचे झाले असल्याने आगामी निवडणुकीत इतर पक्षांशी हातमिळवणी करायची का, याबाबत संभ्रम आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पक्षाची भूमिका लवकरच स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे पदाधिकारी सांगताहेत. आरक्षणामुळे राजकीय समीकरणे चुकलीपनवेल महापालिकेच्या प्रभाग रचनेची सोडत जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून लोकप्रतिनिधींसमोर ही निवडणूक लढणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल शहर महापालिकेची स्थापना झाली. मात्र त्याधीच कळंबोली, पनवेल, कामोठे, तळोजा, खारघर या ठिकाणी इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी तयारी सुरू केली होती. प्रभाग रचनेचा अंदाज घेऊन अनेक ठिकाणी स्थानिक पक्षांनी कार्यालये सुरू केली आहेत. मंगळवारी आरक्षण जाहीर झाल्यावर अनेकांची राजकीय समीकरणे चुकली तर काही इच्छुकांचा हिरमोड झाल्याने त्यांनी नातेवाइकांच्या वर्णीसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्षपदाकरिता इच्छुकांची यादीपनवेल महापालिका झाल्याने राजकीयदृष्ट्या पनवेल हा जिल्हा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता स्वतंत्र जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्याकरिता डॉ. भक्तीकुमार दवे, विद्यमान रायगड जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, कामगार नेते श्याम म्हात्रे आदी नेते, पदाधिकारी इच्छुक आहेत. मागील निवडणुक उरण विधानसभा मतदारसंघात लढलेले महेंद्र घरत सुध्दा जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. याशिवाय कांतीलाल कडू यांचे नाव सुध्दा चर्चेत आहे.