पॉवरब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2016 03:27 AM2016-05-09T03:27:25+5:302016-05-09T03:27:25+5:30
मध्य रेल्वेने रविवारी शहाड- आंबिवली स्थानकांदरम्यान घेतलेला पॉवरब्लॉक, कल्याण येथे पुलासाठी गर्डर टाकणे आणि कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी घेतलेल्या
कल्याण / टिटवाळा : मध्य रेल्वेने रविवारी शहाड- आंबिवली स्थानकांदरम्यान घेतलेला पॉवरब्लॉक, कल्याण येथे पुलासाठी गर्डर टाकणे आणि कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कल्याण-टिटवाळा मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तास पूर्णत: बंद होती. मात्र, उद््घोषणा होत नसल्याने प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. दरम्यान, शहाड-आंबिवली स्थानकांदरम्यान तीन तासांचा पॉवरब्लॉक घेतला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. त्यामुळे टिटवाळा येथे गणपतीच्या दशर््ानासाठी गेलेल्या भाविकांना तीन तास टिटवाळा स्थानकातच थांबावे लागले. काहींनी रिक्षाने प्रवास करत कल्याण गाठले. पॉवरब्लॉकचा फायदा रिक्षाचालकांनी पुरेपूर घेतला. त्यांनी प्रत्येक सीटसाठी १०० रुपये आकारले. (प्रतिनिधी)