एनएमएमटीने २३२ फेऱ्या वाढवूनही प्रवाशांचे मेगाहाल

By नारायण जाधव | Published: October 2, 2023 08:05 PM2023-10-02T20:05:52+5:302023-10-02T20:07:02+5:30

तरीही प्रवाशांची गैरसोय झाली.

passengers trouble despite increase of 232 trips by nmmt | एनएमएमटीने २३२ फेऱ्या वाढवूनही प्रवाशांचे मेगाहाल

एनएमएमटीने २३२ फेऱ्या वाढवूनही प्रवाशांचे मेगाहाल

googlenewsNext

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ३८ तासांच्या मेगाब्लॉक काळात एनएमएमटीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेगाब्लॉक कालावधीत २८ विशेष बसच्या २३२ फेऱ्यांद्वारे बससेवा देण्याची व्यवस्था केली होती.

याव्यतिरिक्त बेलापूर रेल्वेस्थानक ते पनवेल रेल्वेस्थानकादरम्यान दैनंदिन धावणाऱ्या विविध मार्गांच्या ४६ बसच्या १९६ फेऱ्यादेखील प्रवाशांना उपलब्ध होत्या. मात्र, या मार्गावरून प्रवास करणारे दैनंदिन प्रवासी आणि सलग सुट्यामुळे मुंबई-ठाणे परिसरात जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने एनएमएमटीच्या वाढीव फेऱ्याही अपुर्ण पडल्या.

मेगाब्लॉक कालावधीत खारघर व तळोजा विभागातून विविध मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खारघर रेल्वेस्थानकाऐवजी बेलापूर रेल्वेस्थानकापर्यंत बस उपलब्ध करून दिलेल्या होत्या. तसेच खारघर रेल्वेस्थानक येथून सुटणाऱ्या बस या बेलापूर रेल्वेस्थानकातून सोडण्यात आल्या होत्या. तरीही प्रवाशांची गैरसोय झाली.

Web Title: passengers trouble despite increase of 232 trips by nmmt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.